scorecardresearch

Premium

अवांतर : केसांच्या सौंदर्यासाठी

सध्या जवळपास ९० टक्के लोकांना केसांच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या कोणत्या आणि त्यावर उपाय कोणते ते आपण पाहू यात.

tips to grow long healthy hair tips for healthy hair beauty tips for hair
(संग्रहित छायाचित्र)

डॉ. वैशाली वलवणकर

सर्वाच्या अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय म्हणजे केस. स्त्री-पुरुषांचे व्यक्तिमत्व केसांच्या सौंदर्यावर अवलंबून असते. केसांचे सौंदर्य हे केवळ लांबीवर अवलंबून नसते तर ते किती निरोगी चमकदार आहेत यावर अवलंबून असते. सध्या जवळपास ९० टक्के लोकांना केसांच्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्या कोणत्या आणि त्यावर उपाय कोणते ते आपण पाहू यात.

Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
10 Habits of Successful People
यशस्वी लोकांच्या फक्त ‘या’ १० सवयींमुळे बदलू शकते तुमचे आयुष्य; त्या सवयी कोणत्या आहेत, जाणून घ्या….
shani dev rise in kumbh rashi will show affect on these zodiac signs
Shani Dev : शनिचा लवकरच होतोय उदय ; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार? अमाप धनसंपत्तीसह मिळेल भरपूर यश
Health Special
Health Special : पॉझिटिव्ह पालकत्व म्हणजे काय?

केसांविषयीच्या समस्या

१) केस गळणे / तुटणे

२) कोंडा होणे

३) केस पांढरे होणे (पालित्य)

४) टक्कल पडणे

केस गळण्याची प्रमुख कारणे –

१) हार्मोन्समधील असंतुलन (उदाहरणार्थ थायरॉईड,  PCOD)

२) मानसिक ताणतणाव

३) जीवनसत्त्वांची कमतरता

४) तीव्र रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर.

५) हेअर ड्रायरचा अति वापर

६) हेअर डायचा वापर

हेही वाचा >>> Health Special: जंकफूड म्हणजे सत्वहीन अन्न

केसांच्या आरोग्यासाठी काय करू नये?

१) केस धुण्यासाठी अति गरम पाण्याचा वापर करू नये.

२) केस ओले असताना विंचरू नयेत.

३) केस धुण्यासाठी तीव्र शाम्पूचा वापर करू नये.

४) केसांना जास्त घट्ट क्लीप अथवा रबर बँड बांधू नये.

५) कृत्रिम रंगाचा (डायचा) वापर शक्यतो टाळावा.

६) केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा सतत वापर करू नये. हेअर ड्रायरमध्ये असणाऱ्या गरम हवेच्या वापरामुळे केसांचे क्युटिकल ओपन होतात आणि केसांच्या शाफ्टला इजा होते. केसांमधील नैसर्गिक तेलांचा ऱ्हास होवून केस अधिकाधिक कोरडे होतात आणि त्याचा लवकर गुंता होतो. तसेच डोक्याची त्वचा (SCALP) ला सुद्धा कोरडेपणा येवून केसांत कोंडा होतो.

हेही वाचा >>> वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

७) केस सतत विंचरू नयेत.

८) पिमग, रिबॉडिंग, हायलाटिनग अशा कृत्रिम प्रकारांचा वापर टाळावा.

९) बाहेर जाताना केस मोकळे सोडू नयेत.

१०) पांढरे झालेले केस तोडू नयेत किंवा ओढून काढू नयेत.

११) अति प्रमाणात मानसिक किंवा शारीरिक त्रास करून घेवू नये.

मजबूत केसांसाठी काय करावे?

’ रोज १० – १२ ग्लास पाणी प्यावे.

’ आठवडय़ातून दोनदा केसांच्या मुळाशी हलक्या हाताने तेलाने मसाज करावा. मसाजसाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचा वापर करू शकतो. तसेच आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाचाही वापर करू शकतो. मालिश नेहमी हलक्या हातानेच करावी. केस जास्त जोरात चोळू नयेत.

* आठवडय़ातून एकदा केसांना वाफ द्यावी.

* तीन महिन्यातून एकदा केसांची टोके कापावीत. (ट्रिमिंग करावे.)

* केसांमध्ये कोंडा होणार नाही याची काळजी घ्यावी.

* आहारात कॅल्शिमयुक्त पदार्थाचा (उदाहरणार्थ दूध, पनीर, पालक, खारीक, खाण्याचा डिंक, तूप), हिरव्या पालेबाज्यांचा समावेश करावा.

तसेच जीवनसत्व ‘ब’ असणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

(उदाहरणार्थ – हातसडीचा तांदूळ, यीस्ट, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या)

* नेहमी आनंदी रहावे. ताणतणावापासून दूर राहण्यासाठी मेडिटेशन करावे.

* अनुलोम – विलोम, कपालभाती अशा प्राणायामच्या क्रियांचा अवलंब करावा.

* आठवडय़ातून एकदा पादाभ्यंग करावे. (तळपायांना तेल लावावे)

१०) बाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा.valvankar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tips to grow long healthy hair tips for healthy hair beauty tips for hair zws

First published on: 12-09-2023 at 18:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×