रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर नियंत्रणात असणे आवश्यक असते. जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर हृदयविकार, किडनीच्या समस्या असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तज्ञांच्या माते रक्तातील साखरेची पातळी वाढणे किंवा कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. अशी परिस्थिती कधी निर्माण होते, रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात जाणून घ्या.

रक्तातील साखरेची पातळी कमी कधी होते?
रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास हायपोग्लायसेमिया देखील म्हणतात. यामागे अनेक कारणं असु शकतात. वेळेवर न जेवणे, इन्सुलीनचे वाढलेले प्रमाण, गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे, अल्कोहोलचे अति सेवन, अतिप्रमाणात औषधं खाणे यांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

what is normal blood sugar level
तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता
diabetes symptoms in legs
Blood Sugar: ब्लड शुगर वाढल्यास पायात दिसतात ही ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या पायाच्या कोणत्या भागात होतो त्रास
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
diabetes sign
कोणत्या वयात डायबिटीज होण्याचा धोका सर्वात जास्त असतो? ‘ही’ ५ लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा

आणखी वाचा: ‘ही’ आहेत हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होण्याची कारणं; लगेच करा बदल

रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याची लक्षणं

  • घाम येणे
  • हात, पाय थरथरणे
  • अस्वस्थ वाटणे
  • थकवा जाणवणे
  • सतत भूक लागणे

रक्तातील साखरेची पातळी कधी वाढते?
रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास हायपरग्लायसेमिया देखील म्हणतात. यामागे अनेक कारणं असु शकतात. एखादा जुना आजार, गरजेपेक्षा जास्त जेवणे, इन्सुलिनचे कमी प्रमाण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याची लक्षणं

  • जास्त थकवा जाणवणे
  • सतत लघवी होणे
  • दृष्टी धुसर होणे
  • वारंवार तहान लागणे
  • डोकेदुखी
  • चक्कर येणे

आणखी वाचा: हिवाळ्यात अशी घ्या हृदयाची काळजी; ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील गोष्टी ठरतील फायदेशीर

  • रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा
  • वेळेवर जेवावे, जेवण करणे टाळू नये
  • कमी कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
  • ट्रान्स फॅट असणारे पदार्थ टाळावे, जेवणात साखर आणि मिठाचा अतिवापर टाळावा.
  • गोड खाण्याची इच्छा होत असल्यास फळं खावी.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)