High Cholesterol in Young : कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे; पण खराब कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. धावपळीच्या आयुष्यात नीट आहार न घेणे, चुकीची लाइफस्टाईल, व्यायामाची कमतरता इत्यादी कारणांमुळे तरुणाईमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याची अनेक प्रकरणे दर दिवशी समोर येतात. तरुणाईमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलला कोणते घटक कारणीभूत आहेत, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली.

डॉ. सुरंजित चॅटर्जी सांगतात, “विशीतील अनेक तरुणाई माझ्याकडे येतात आणि रिपोर्ट बघेपर्यंत त्यांना विश्वास बसत नाही की, त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले आहे. पूर्वी वृद्ध लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेले दिसायचे; पण आता तरुणाईमध्येसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढत असल्याची प्रकरणे समोर आली आहेl आणि ही खूप चिंतेची बाब आहे. अनेकदा तरुण मंडळी याकडे लक्ष देत नाहीत. कारण- कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे लगेच दिसत नाहीत.

Is your morning bread an enemy of gut health? Here’s why you should junk all ultra-processed foods
रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?
Rohit Sharma
IPL 2024: रोहित शर्मा भडकला आणि म्हणाला, ‘एक्सक्लुसिव्ह कंटेंटच्या नादात विश्वासाला तडा जातोय’
non stick pans are harmful icmr
नॉन-स्टिक भांडी वापरताय? देशातील सर्वोच्च आरोग्य संस्थेने दिले धोक्याचे संकेत
parveen shaikh
मुंबईतील मुख्याध्यापिकेकडून हमासचं समर्थन, शाळा प्रशासनाने बडतर्फ केल्यानंतर म्हणाल्या, “राजकीय हेतूने…”
Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती
girl strangled to death in honour killing
पालममध्ये गळा दाबून मुलीचा खून; दहा दिवसानंतर ‘ऑनर किलिंग’ची घटना उघडकीस
loksatta analysis elon musk visits china to deals self driving
एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लहान वयात असताना किंवा किशोरवयीन मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्यास सुरुवात होते; पण वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंत याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच अनेक तरुण लोकांना वयाच्या विशीत रक्तात प्लेक तयार झाल्यामुळे म्हणजेच रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

तरुण लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण का वाढले?

जीवनशैली व आहार निवड यांचा थेट परिणाम कोलेस्ट्रॉलवर होतो आणि लहानपणापासून चिप्सच्या पॅकेटपासून याची सुरुवात होते. फास्ट फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स जास्त असतात. तरुणाई खूप जास्त प्रमाणात फास्ट फूड खात असल्याचा परिणाम त्यांच्यातील कोलेस्ट्रॉलवर दिसून येत आहे.
चुकीच्या आहाराच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यात व्यायामाची कमतरता असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढताना दिसत आहे.
साखरयुक्त पेये व स्नॅक्समुळे शरीरात ट्रायग्लिसेराइडची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. या असंतुलित कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

जर कुटुंबात कोणाला यापूर्वी मधुमेह असेल, तर त्याचासुद्धा थेट परिणाम तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या आकडेवारीवर दिसून येतो. डायबेटिक डिस्लिपिडेमियामुळे तर तुमचे चांगले आणि खराब, असे दोन्ही प्रकारचे कोलेस्ट्रॉल वाढू शकते

हेही वाचा : मधुमेहींनी संध्याकाळचा नाश्ता करावा की नाही? तज्ज्ञांचा सल्ला नक्की वाचा…

नियमित कोलेस्ट्रॉल तपासा

तरुणाईमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लवकर परिणाम दिसत नाहीत. जेव्हा अंदाज येतो तेव्हा परिस्थिती बिघडलेली असते. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होतात. यालाच ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. अॅथेरो म्हणजे फॅट आणि स्क्लेरोसिस म्हणजे जमा होणे होय. जेव्हा फॅट्स जमा होऊन प्लेक्स तयार होतात तेव्हा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो; ज्यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. सुरुवातीला कोणतेही लक्षण दिसत नाही आणि त्यामुळे जरी तुम्ही तंदुरुस्त दिसत असला तरी तरुणाई आणि वयोवृद्ध लोकांनी दर पाच वर्षांनी त्यांचे कोलेस्ट्रॉल तपासणे गरजेचे आहे. दरवर्षी ते तपासले, तर आरोग्यासाठी ती बाब अधिकच उत्तम आहे.

अनेक जण लठ्ठपणाचा संबंध वाढत्या कोलेस्ट्रॉलशी जोडतात; पण तु्म्हाला माहीत आहे का की, सडपातळ लोकांचेसुद्धा कोलेस्ट्रॉल वाढू शकते. लवकरात लवकर कोलेस्ट्रॉलची मात्रा योग्य आहे की नाही, हे जाणून घेऊन तसा आहारात आणि जीवनशैलीत बदल केला, तर तुम्ही आरोग्याचा धोका कमी करू शकता.

संतुलित आहार घ्या. फळे, भाजीपाला, कडधान्ये आणि प्रोटिनयुक्त पदार्थ खा. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान करणे टाळा आणि मद्यपान कमी करा. या गोष्टी केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.