चिंच.. म्हटली की जिभेवर रेंगाळते ती म्हणजे आंबट गोड चव. पाणीपुरी, शेवपुरी .. चिंचेची आंबट-गोड आमटी.. असे एक ना अनेक भारतीय पदार्थ चिंचेच्या वापराशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. अगदी प्राचीन काळापासून भारतीय खाद्य संस्कृतीत चिंच हा अविभाज्य भाग आहे. चिंच हे भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या बहुउद्देशीय उष्णकटिबंधीय फळझाड प्रजातींपैकी एक आहे. चिंच हा बहुवर्षायू वृक्ष असून या झाडाचे मूळ ॲबिसिनियात आणि मध्य आफ्रिकेत असल्याचे अभ्यासक मान्य करतात. आज चिंच हे झाड उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळते. भारतात विशेषेकरून कोकण व उत्तर कारवार येथील जंगलात चिंच मोठ्या प्रमाणात दिसते. चिंचेच्या झाडाचे मूळ आज आफ्रिकेतील असले तरी चिंचेचे फळ मोठ्या प्रमाणात प्रथम भारतात उत्पादित केले जात होते असे मानले जाते. (संदर्भ: Tamarindus indica: Extent of explored potential by Santosh Singh Bhadoriya, Aditya Ganeshpurkar, Jitendra Narwaria, Gopal Rai, and Alok Pal Jain, Pharmacogn Rev. 2011, Jan-Jun; 5(9): 73–81.)

उर्वरित भारतात हे झाड जगते परंतु कोकण आणि कारवार प्रमाणे चिंचेच्या फळाची गुणवत्ता तिथे मिळत नाही.. यामागील मुख्य कारण भारत आणि आफ्रिका सोळाशे लक्ष वर्षांपूर्वी एक भूभाग असल्याने हे साम्य आढळत असावे, असे अभ्यासक मानतात. किंबहुना काही अभ्यासकांच्या मते चिंचेचे बी हे समुद्रमार्गे कोकण आणि कारवार यांच्या किनाऱ्यावर रुजले गेले, आणि त्यानंतर ते उर्वरित भारतात पसरले. असे असले तरी उर्वरित जगाला चिंचेची ओळख झाली ती केवळ भारतामुळे. चिंचेला इंग्रजीत टॅमरिंड असे म्हणतात. चिंचेचे शास्त्रीय नाव ‘टॅमॅरिंडस इंडिकस’ आहे. हा शब्द मूलतः पर्शियन शब्दावरून आला आहे. पर्शियन भाषेत चिंचेला “तमार-इ-हिंद” असे म्हणतात. याचा अर्थ ‘हिंदचे खजूर’ असा आहे. संस्कृत मध्ये चिंचेला “अम्लिका” असे म्हटले जाते. तर संस्कृत ग्रंथांमध्ये चिंचेच्या वृक्षाला ‘तिन्त्रिणी वृक्ष’ असे संबोधले गेले आहे . चिंचेची पाने, बिया आणि साल अनेक आरोग्यविषयक आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
Loksatta kalakaran Gandhi Jayanti Gandhiji ​non violent satyagrah
कलाकरण: बंदुकीच्या अल्याडपल्याड…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?

अधिक वाचा : मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन?

चिंचेशी संलग्न आख्यायिका

पौराणिक कथांमध्ये चिंचेच्या झाडाची सावली कृष्णासारखी पवित्र असल्याचे म्हटले आहे. राधेपासून विभक्त झालेला श्रीकृष्ण चिंचेच्या झाडाखाली बसला होता, अशी आख्यायिका आहे. चिंचेची पाने रात्रीची दुमडतात, यासंदर्भातील आख्यायिका शिव आणि भस्मासूर यांच्यातील संघर्षाशी सलंग्न आहे. शिव आणि भस्मासूर यांच्यातील युद्धाच्या दरम्यान जखमी भस्मासूर चिंचेच्या झाडावर लपला होता. शिवाने आपल्या अंतःचक्षूने भस्मासुराचा शोध घेतला त्यावेळेस भस्मासूर दिसावा म्हणून चिंचेच्या झाडाने आपली पाने दुमडून घेतली. अशा अनेक आख्यायिका चिंचेच्या झाडाशी संबंधित आहे. या पौराणिक आख्यायिका असल्या तरी एक दंतकथा विशेष करून चिंचेच्या झाडासंदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे या झाडावर भूत, चेटकीण या सारख्या अमानवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपू नये किंबहुना जाऊही नये असे सांगितले जाते, असे केल्यास भूतबाधा होते असा समज आहे. परंतु अशा स्वरूपाची कथा, आख्यायिका का प्रसिद्ध झाली यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे तज्ज्ञ मानतात. रात्रीच्या वेळी चिंचेच्या झाडाखाली का झोपू नये, यामागील शास्त्रीय कारण समजून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.

चिंच इतर वनस्पतींना मारणारी वनस्पती

चिंच हे एक Allelopathic झाड आहे. अ‍ॅलेलोपॅथी हा शब्द ग्रीक शब्द अ‍ॅलेलॉन आणि पॅथी या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. अ‍ॅलेलॉन म्हणजे दुसऱ्यावर किंवा परस्पर आणि पॅथी म्हणजे सफरींग-वेदना. ज्या वनस्पतीमुळे दुसऱ्या वनस्पतींवर घातक परिणाम होतो त्यांना अ‍ॅलेलोपॅथी ही संज्ञा वापरण्यात येते. अ‍ॅलेलोपॅथी वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर घातक रसायनं सोडतात. ही रसायनं वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांद्वारे सोडली जाऊ शकते किंवा नैसर्गिक विघटनाद्वारे सोडली जाऊ शकतात. अ‍ॅलेलोपॅथी या शब्दाचे श्रेय ऑस्ट्रियन प्राध्यापक ‘हॅन्स मोलिश’ यांना दिले जाते, त्यांनी १९३७ साली “द इफेक्ट ऑफ प्लांट्स ऑन इच अदर” या पुस्तकात हा शब्द सर्वात आधी वापरला. असे असले तरी या वनस्पतींच्या या गुणधर्माविषयी प्राचीन काळापासून मानवाला प्रचिती असल्याचे नोंदविले गेले आहे. प्राचीन ग्रीक आणि रोमन नोंदींमध्ये या वनस्पतींचा उल्लेख विषारी असा करण्यात आलेला आहे. केवळ चिंचच नाही तर काळया अक्रोडच्या झाडाचाही याच प्रकारात समावेश होतो म्हणूनच प्लिनी द एल्डरने इसवी सनाच्या पहिल्या शतकात काळया अक्रोडाच्या झाडाला विषारी म्हणून नोंदविले आहे.

अधिक वाचा : बंगालमधील ‘हे’ मारवाडी व्यापारी घराणे ठरले होते मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनीचे कर्जदाते !

अ‍ॅलेलोपॅथी म्हणजे काय?

अ‍ॅलेलोपॅथी ही एक जैविक प्रक्रिया आहे ज्यामध्ये एक वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी शेजारच्या वनस्पतीची वाढ पूर्णपणे थांबवते. अ‍ॅलेलोपॅथी ही एक जगण्याची यंत्रणा आहे. निसर्गात प्रत्येक सजीव हा जगण्याच्या स्पर्धेत असतो. चार्ल्स डार्विन याच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या सिद्धांताप्रमाणे अ‍ॅलेलोपॅथी या गटात मोडणाऱ्या वनस्पती, झाडे स्वतःच्या वाढीसाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या इतर वनस्पतींची वाढ थांबवितात. या वनस्पती मुख्यत्त्वे आपल्या मुळांद्वारे जमिनीत विषारी रसायनं सोडतात, त्यामुळे त्या झाडाच्या आजूबाजूच्या झाडांची वाढ खुंटीत होवून झाडे मरतात. त्याचमुळे चिंचेच्या आजूबाजूला इतर वनस्पती आढळत नाही. चिंचेप्रमाणे काळं अक्रोड ही अंगणात न लावण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोडाच्या झाडाचे सर्व भाग हायड्रोजुग्लोन तयार करतात, जे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर अ‍ॅलेलोटॉक्सिनमध्ये रूपांतरित होते. अक्रोडाच्या झाडांची मुळे, कुजणारी पाने आणि डहाळे हे सर्व आसपासच्या जमिनीत जुग्लोन सोडतात, ज्यामुळे इतर अनेक वनस्पतींच्या वाढीस प्रतिबंध होतो. नुकत्याच झालेल्या प्रयोगशाळा आणि ग्रीनहाऊस या दोन्ही प्रयोगांतून असे दिसून आले की ‘चिंचेच्या झाडाची पाने आणि मुळांमध्ये जैविक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वाढ नियंत्रक असतात आणि ते अ‍ॅलेलोपॅथीद्वारे झाडाच्या खोडाजवळ तणमुक्त वातावरण तयार करण्यात गुंतलेले असतात (संदर्भ: Parvez, Syeda & Parvez, Mohammad & Fujii, Yoshiharu & Gemma, Hiroshi. (2003). Allelopathic competence of Tamarindus indica L. root involved in plant growth regulation. Plant Growth Regulation. 41. 139-148. 10.1023/A:1027387126878). म्हणूनच चिंचेचे झाड घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात लावू नये असे सांगितले जाते. याच कारणामुळे चिंचेचे झाड नेहमीच एकांतवासात, एकाकी असते, त्याचमुळे या झाडाशी निगडित अमानवी कथा उत्त्पन्न झाल्या आहे.

रात्री का झोपू नये या झाडाखाली?

चिंचेच्या झाडावर भूत किंवा चेटकीण तत्सम वाईट शक्ती असल्याने या झाडाखाली रात्रीचे झोपू नये किंवा शक्यतो जाऊ नये असे म्हटले जाते. सर्वच झाडे रात्रीच्या वेळेस कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने रात्रीच्या वेळेस या झाडांखाली न झोपण्याचा सल्ला दिला जातो. या संदर्भात पुरावनस्पती अभ्यासक देवदत्त पोखरकर (Research scholar deccan college, pune) यांच्याशी ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने संपर्क साधला असता, त्यांनी नमूद केले की ‘चिंचेच्या झाडापासून माणसाला भूतबाधा वगैरे होत नाही, इतर झाडांच्या तुलनेत चिंचेचे झाड अधिक कार्बन डायऑक्साईड सोडत असल्याने पक्षीही या झाडावर घरटी करत नाहीत, अपवादात्मक परिस्थिती वगळता. पक्षी चिंचेच्या झाडावरील फळे दिवसा खातात, त्या साठी त्या झाडावरही जातात, परंतु रात्रीच्या वेळेस पक्षीही चिंचेच्या झाडाजवळ भटकत नाहीत. दुसरं महत्त्वाचं कारण असं थंडाव्यासाठी साप-नाग -अजगर रात्रीच्या वेळेस चिंचेच्या झाडावर वास्तव्यासाठी जातात. त्यामुळे अज्ञानाने रात्रीच्या वेळेस या झाडाखाली झोपल्यास सर्प-विंचू चावण्याचा धोका असतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत सापाची श्वसनक्रिया कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी अधिक प्रभावी असते त्यामुळे चिंचेच्या झाडावर साप रात्रीच्या वेळेस सहज वास्तव्य करू शकतो. बऱ्याच वेळा चिंचेच्या झाडावर घुबडाचा वावर असतो. जे काही मोजके पक्षी सापाला खातात, त्यात घुबडाचा समावेश होतो. त्यामुळे ‘जीवो जीवस्य जीवनम्:’ हे येथे अक्षरश: खरे ठरते. चिंचेचे झाड त्याच्या उपजत अ‍ॅलेलोपॅथी धर्मामुळे एकाकी असते. त्यात अधिक कार्बन डायऑक्साईड सोडणारे झाड, या झाडावर रात्रीच्या वेळेस साप, घुबड यांचा वावर, अक्राळ-विक्राळ फांद्या यासर्वांमुळे या झाडावर भूत असल्याच्या आख्यायिका प्रचलित झाल्या आहेत.