आहारामध्ये फळे, भाज्या, धान्यापासून तयार केलेले ब्रेड, ऑलिव्ह ऑइलचा समावेश केल्याने आयुर्मान वाढत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा अभ्यास जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. दाहशामक पदार्थाचा आहारात समावेश केल्यामुळे आयुर्मान वाढत असून कर्करोग आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कमी होतो. पोलंडमधील वॉरसॉ विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासात ४५ ते ८३ या वयोगटातील ६८,२७३ पुरुष आणि महिलांचा समावेश होता. १६ वर्षे या लोकांचा अभ्यास करण्यात आला. जे लोक  दाहशामक आहाराचे सेवन करीत होते. त्यांना मृत्यूचा धोका १८ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका २० टक्क्यांनी तर कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका १३ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy food need for good health
First published on: 16-09-2018 at 01:37 IST