juice recipe in Marathi: बदलत्या ऋतूंचा आपल्या आरोग्यावर, तसेच केस आणि त्वचेवर मोठा परिणाम होतो. उन्हाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो तेव्हा कोरडी त्वचा, केस गळणे किंवा निस्तेजपणा यांसारख्या समस्या सामान्य होतात. अशा वेळी शरीराला आतून पोषण देणारे एक नैसर्गिक पेय आपल्या सौंदर्यासाठी जादुई ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर एक खास आरोग्यदायी पेय ट्रेंड करीत आहे – AAABC ज्यूस. नाव विचित्र वाटत असले तरी हा रस आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवला जातो आणि त्याचे फायदे आश्चर्यकारक आहेत.

काय आहे AAABC ज्यूस?

AAABC ज्यूस हे असे एक नैसर्गिक पेय आहे, जे शरीराला आतून डिटॉक्स करते, त्वचेला चमकदार बनवते आणि केसांना बळकटी देते. नावातील प्रत्येक अक्षर एका पौष्टिक घटकाचं प्रतिनिधित्व करते

  • A – Apple (सफरचंद)
  • A – Amla (आवळा)
  • A – Aloe vera (कोरफड)
  • B – Beetroot (बीट)
  • C – Carrot (गाजर)

हे पाच नैसर्गिक घटक एकत्र येऊन शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स व फायबरचे उत्तम मिश्रण प्रदान करतात.

AAABC ज्यूसचे आरोग्यदायी फायदे

त्वचेला नैसर्गिक चमक देते


आवळा आणि गाजर दोन्ही व्हिटॅमिन सी व ए यांनी समृद्ध असतात. ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि नैसर्गिक चमक आणतात. त्यामुळे त्यांच्या नियमित सेवनाने त्वचा स्वच्छ, मऊ व आरोग्यदायी बनते.

केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक


कोरफड आणि आवळा केसांना आतून पोषण देतात. हे दोन्ही घटक टाळूला मॉइश्चराइझ करून, केस गळणे कमी करतात आणि कोंडा होण्यापासून रोखतात.

लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत


बीट आणि कोरफड यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकतात, ज्यामुळे शरीर हलके होते आणि पचन सुधारते.

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ


सफरचंद आणि आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सर्दी आणि खोकल्यापासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करतात.

रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा उजळते


बीट आणि गाजर रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक गुलाबी रंग मिळतो आणि थकवा कमी होतो.

AAABC ज्यूस बनवण्यासाठी लागणारी सामग्री

  • १ छोटंेसफरचंद
  • १ आवळा
  • अर्धे बीट
  • १ गाजर
  • २ चमचे कोरफड जेल
  • अर्धा कप पाणी
  • चवीनुसार लिंबाचा रस आणि काळे मीठ

AAABC ज्यूस बनवण्याची सोपी पद्धत

सर्व फळं आणि भाज्या नीट धुऊन घ्या. मिक्सरमध्ये सफरचंद, आवळा, गाजर, बीट व कोरफड जेल टाका. अर्धा कप पाणी टाकून स्मूदी वा ज्यूस तयार करा. शेवटी चवीनुसार त्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ मिसळा. हे आरोग्यदायी पेय थंड सर्व्ह करा. सकाळी रिकाम्या पोटी AAABC ज्यूस प्यायल्यास त्याचे अधिक फायदे मिळतात. दररोज एक ग्लासभर हा ज्यूस प्यायल्याने त्वचा उजळते, केस मजबूत होतात आणि शरीर हलकं वाटतं. AAABC ज्यूस म्हणजे फक्त एक पेय नाही, तर ते एक नैसर्गिक टॉनिक आहे, जे शरीर, त्वचा व केस अशा तिन्हींची काळजी घेण्याच्या दृष्टीनेसाह्यभूत ठरते. या ज्यूसचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात केल्यास काही दिवसांतच बदल दिसून येतो, अगदी आतून आरोग्यदायी आणि बाहेरून तेजस्वी!