High BP Solution: हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) ही आज जगभरात एक गंभीर आरोग्य समस्या आहे. सध्या जगात सुमारे १.२८ अब्ज लोक या आजाराने त्रस्त आहेत. हा एक दीर्घकालीन आजार आहे आणि जर यावर नियंत्रण ठेवले गेले नाही तर हृदयविकार (Heart Disease) आणि स्ट्रोक (Stroke) होण्याचा धोका खूप वाढतो. या आजाराला “सायलेंट किलर” म्हटले जाते, कारण सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. यामागे चुकीचा आहार, खराब जीवनशैली आणि तणाव ही मुख्य कारणे असतात.

ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी ताबडतोब आपल्या जीवनशैलीत बदल करावा आणि आहारात काही गोष्टी टाळाव्यात. जर तुमचा ब्लड प्रेशर २०० mm Hg पेक्षा जास्त असेल, तर ही खूप गंभीर स्थिती मानली जाते. अशा वेळी दररोज औषध घेणे आणि जीवनशैलीत बदल करणे अत्यावश्यक असते.

मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, बीपी (ब्लड प्रेशर) नियंत्रित करण्यासाठी औषधांची गरज कधी कधी भासू शकते, पण काही नैसर्गिक उपाय आणि जीवनशैलीतले बदल असे आहेत जे औषधांशिवायही बीपी कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर काही चांगल्या सवयी रोजच्या जीवनात आणल्यास तुमचा बीपी नैसर्गिक रितीने नियंत्रणात राहू शकतो. चला तर मग पाहूया, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी कोणत्या सवयी उपयोगी ठरतात.

नियमित चालणे आणि व्यायाम करणे (High Blood Pressure Control)

नियमित चालणे आणि व्यायाम करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील. रोजचा व्यायाम तुमचे हृदय मजबूत बनवतो आणि रक्त पंप करण्याची क्षमता वाढवतो, त्यामुळे धमन्यांवरील ताण कमी होतो आणि बीपी नियंत्रणात राहतो. जर तुम्ही दर आठवड्याला सुमारे १५० मिनिटे मध्यम गतीने चालत असाल किंवा ७५ मिनिटे वेगाने धावत असाल, तर तुमचे ब्लड प्रेशर कमी होऊ शकते आणि हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. रोज फक्त ३० मिनिटे झपाट्याने चालल्यानेही बीपी कमी होण्यास मदत होते.

मिठाचे सेवन कमी करणे

जास्त सोडियम (म्हणजेच जास्त मीठ) खाल्ल्याने तुमचे ब्लड प्रेशर वाढू शकते. जर तुम्हाला बीपी नॉर्मल ठेवायचे असेल, तर आहारात मीठ कमी करा. अनेक संशोधनांमध्ये हे दिसून आलं आहे की, जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या आजारांचा, जसं की स्ट्रोकचा, धोका वाढतो.

जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच उच्च रक्तदाब असेल, तर सोडियम कमी खाल्ल्याने फायदा होतो आणि बीपी कमी होते. मीठ कमी करायचं असेल तर डब्बाबंद भाजीपाला किंवा प्रोसेस्ड फूड न खाता ताज्या गोष्टी खा. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी मसाले आणि औषधी वनस्पती (जसं की हळद, लसूण, आलं) वापरा.

अल्कोहोल सेवन कमी करणे

दारू प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि इतर आजारांचा धोकादेखील वाढू शकतो. काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की, मर्यादित प्रमाणात दारू पिणं हृदयासाठी कधीकधी फायदेशीर ठरू शकतं. स्त्रियांनी दिवसभरात एकच ड्रिंक आणि पुरुषांनी दोन ड्रिंक्सपेक्षा जास्त दारू पिऊ नये. जर तुम्ही यापेक्षा जास्त पित असाल, तर तुमचे ब्लड प्रेशर सतत जास्त राहू शकते.

पोटॅशियमयुक्त पदार्थ खाणे

पोटॅशियम हे एक महत्त्वाचे मिनरल आहे, जे शरीरातून सोडियम बाहेर टाकायला मदत करते आणि रक्तवाहिन्यांवरील दाब कमी करते. आजकाल आपल्या आहारात सोडियम (मीठ) जास्त आणि पोटॅशियम कमी होत चालले आहे, त्यामुळे बीपी वाढण्याचा धोका असतो.

जर तुम्हाला बीपी नॉर्मल ठेवायचे असेल, तर ताजे आणि नैसर्गिक अन्न जास्त खा. पोटॅशियम भरपूर असलेले पदार्थ म्हणजे हिरव्या पानांची भाजी, टोमॅटो, बटाटा, रताळे खा. फळांमध्ये टरबूज, केळं, एवोकॅडो, संत्र खा. दूध, दही, मच्छी (टूना आणि साल्मन), नट्स, बिया, डाळी आणि उसळ यांचाही समावेश आहारात करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताण नियंत्रित करणे

जर तुम्हाला हाय बीपी नैसर्गिक पद्धतीने नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तणावावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तणाव हे उच्च रक्तदाबाचं एक मुख्य कारण असू शकतं. जेव्हा तुम्ही खूप दिवस तणावात असता, तेव्हा शरीर सतत “फाइट-ऑर-फ्लाइट” स्थितीत राहतं. याचा अर्थ, हृदयाची धडधड वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, म्हणून तणाव वेळेवर नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. कारण तणाव फक्त बीपी वाढवत नाही, तर इतर आजारांनाही कारणीभूत ठरतो. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान (मेडिटेशन), खोल श्वास घेण्याचे व्यायाम (डीप ब्रीथिंग), योग किंवा वेळेचं नीट नियोजन (टाइम मॅनेजमेंट) वापरू शकता.