High cholesterol symptoms on Eyes: कोलेस्ट्रॉल हा शरीरात तयार होणारा चिकट चरबीयुक्त पदार्थ आहे. हा पदार्थ रक्तवाहिन्या आणि हृदयाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतो. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचा असतो – एक वाईट कोलेस्ट्रॉल, ज्याला LDL म्हणतात आणि दुसरा चांगला कोलेस्ट्रॉल, ज्याला HDL म्हणतात.
कोलेस्ट्रॉल शरीरासाठी काही प्रमाणात आवश्यक असते. हे शरीराच्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतं. पण, जर कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढलं, तर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची काही मुख्य कारणं आहेत. जसे की, खूप तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे, शरीराची हालचाल कमी करणे, लठ्ठपणा, धूम्रपान आणि दारू पिणे, आनुवंशिक कारणं (आई-वडिलांकडून आलेले), मधुमेह (डायबिटीज)या सगळ्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकतो.
जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतो तेव्हा शरीरात त्याची काही लक्षणं दिसू लागतात (High Cholesterol Symptoms)
साधारणपणे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर खालील लक्षणं दिसतात :
- छातीत दुखणे
- हातपाय सुन्न होणे किंवा गार वाटणे
- त्वचेवर पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या गाठी येणे
- सतत थकवा जाणवणे किंवा थोडंसं चालल्यानंतरच श्वास लागणे.
पण तुम्हाला माहिती आहे का- जेव्हा वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) जास्त वाढतो, तेव्हा डोळ्यांच्या आजूबाजूलाही काही लक्षणं दिसतात. ही लक्षणं तुम्हाला सांगतात की तुमचं कोलेस्ट्रॉल खूप वाढलं आहे आणि हे तुमच्या हृदयासाठी धोका असू शकतो.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विनोद शर्मा यांनी सांगितलं की, हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार आणि स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. हा एक साइलेंट किलर (म्हणजे लपून वाढणारा गंभीर आजार) आहे. जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं, तेव्हा शरीरात काही लक्षणं दिसायला लागतात. डोळ्यांच्या आसपासही काही खास लक्षणं दिसतात, ज्यावरून कळू शकतं की शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढलं आहे. चला तर मग, आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोळ्यांभोवती नेमकी कोणती लक्षणं दिसतात.
वाईट कोलेस्ट्रॉल वाढताच डोळ्यांमध्ये ही चार लक्षणे दिसू लागतात…
- डोळ्यांभोवती पांढरे किंवा पिवळे डाग
- डोळ्यांमधील कॉर्नियाभोवती पांढरे किंवा निळे वर्तुळ तयार होणे, ज्याला आर्कस सेनिलिस म्हणतात.
- अंधुक दृष्टी हे देखील वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचे एक कारण आहे.
- डोळ्यांत वेदना आणि जळजळ होणे ही देखील वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे आहेत.
या स्थितीत रुग्णाच्या पेरिफेरल व्हिजनमध्ये (बाजूने दिसण्याच्या क्षमतेत) बदल होतो. पेरिफेरल व्हिजन म्हणजे डोळ्यांच्या कडेने दिसणं- यात रुग्णाला अडचण येते. अशी वेळ येते की रुग्णाला मान न हलवता बाजूने पाहता येत नाही.
आंबट फळं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायला मदत करतात…
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विनोद शर्मा यांनी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही फळं खाण्याचा सल्ला दिला आहे. व्हिटॅमिन सीने भरपूर असलेली आंबट फळं फक्त रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) वाढवत नाहीत, तर कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात ठेवतात.
डाएटमध्ये संत्र, लिंबू, आवळा, द्राक्षं आणि मोसंबी यांचा समावेश केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. या फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. या फळांचा नियमित वापर केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
लसूण
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की, लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. लसूणमध्ये अॅलिसिन (Allicin) नावाचा एक सक्रिय घटक असतो, जो शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होणं थांबवतो आणि LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी करतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे लसूण रक्तवाहिन्यांमध्ये होणारी सूज कमी करण्यात मदत करतो.
अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडो हे असं फळ आहे, ज्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात.
फायबरने भरपूर असल्यामुळे हे फळ खाल्ल्याने नसांमध्ये साचलेलं वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर टाकायला मदत होते. अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य (प्लांट बेस्ड) घटकांमुळे, अॅव्होकॅडो हृदयाचं आरोग्य सुधारतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतो.