हिना खान ही टीव्हीच्या विश्वातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. हिना खान हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सिरियलपासून तिच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर तिने ज्या प्रकारे स्वतःला बदलले ते नवीन अभिनेत्रींच्या इम्प्रेशनपेक्षा कमी नाही. हिना खानला फिटनेसची खूप काळजी असते. त्यामुळे ती अनेकदा वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते. पण आता हिना खानने तिच्या फिटनेस आणि बॉडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तिने एक नोट लिहिली आहे, ज्यात तिने सांगितले आहे की तिच्यासाठी शारीरिक स्वरूपापेक्षा मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच बरोबर हिना खानने याचवर्षी आपल्या वडिलांना गमावलेले असून वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिने मानसिकदृष्ट्या तिच्यासाठी खूप चढ -उताराचे होते. दरम्यान ती सतत तिच्या कामावरही लक्ष केंद्रित करत होती. आता हिना खानने तिचे वाढलेले वजन आणि मानसिक आरोग्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हिना खान पुन्हा तिच्या वर्कआउटमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यासाठी मानसिक शांती आणि डेडिकेशन देणे खूप आवश्यक आहे. यावेळी हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमधल्या पोस्ट मध्ये लिहिले की, ”गेल्या काही महिन्यांत मी काही कारणांमुळे वजन वाढवले ​​होते आणि माझे किती किलो वजन वाढले होते याकडे मी खरोखर लक्ष दिले नाही. माझ्यासाठी मानसिक आरोग्य अधिक महत्वाचे आहे आणि मला फक्त अशा गोष्टी करायच्या होत्या ज्यामुळे मला आनंद मिळेल. लोकं काय म्हणतील किंवा मी कशी दिसते याबद्दल जास्त विचार न करता, कधीकधी तुम्ही जसे आहात तसे रहा, तुम्हाला जे वाटते ते करा. शेवटी, आयुष्यात काहीही करण्यासाठी योग्य मानसिक स्थितीत असणे आवश्यक आहे. शारीरिक देखाव्याऐवजी मी आधी मानसिक आरोग्य निवडले आणि आता मी परत आली आहे.”

हिना खानच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये वॉक करताना दिसली. यादरम्यान ती लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत होती. हिना खान अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेली असते. फोटो, व्हिडीओ, लाईव्ह द्वारे संवाद साधत असते. तसेच ती जे काही बोलते अगदी मनमोकळेपणाने बोलत असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan gaining weight i chose mental health over my physical appearance scsm
First published on: 21-10-2021 at 21:05 IST