एचआयव्ही-ग्रस्त रुग्णामधील प्राणघातक संसर्गापासून बचाव करणारे नैसर्गिक प्रतिद्रव्य एड्सवरील नवसंशोधनातून तयार करण्यात आलेल्या औषधामध्ये(लस) असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. काही जणांच्या शरीरात एचआयव्हीवर प्रभाव टाकणारे प्रतिद्रव्य नैसर्गिक पद्धतीने आढळले असून विषाणूच्या प्रादुर्भावानंतर झपाटय़ाने तयार होणाऱ्या मानसिक ताणाच्या निष्क्रियीकरणावर परिणामकारक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
‘द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिटय़ूट’(टीएसआरआय), ‘ला जोला इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅलर्जी आणि इम्युनॉलॉजी’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एड्सवरील लस संशोधनासाठी कार्यरत असणाऱ्या अमेरिकेतील (आयएव्हीआय सारख्या) संस्था एचआव्हीचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या ‘व्यापक निष्क्रियीकरण’ औषधाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. तर सद्य:स्थितीत शोधण्यात आलेली लस ही एचआयव्ही ग्रस्त रुग्णाच्या शरीरातील विषाणूचे निष्क्रियीकरण करणारे प्रतिद्रव्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ही लस टोचल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या विशेष पेशी कार्यरत आणि एकत्र बांधण्याचे कार्य करणाऱ्या ‘ब’ पेशींची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश लोकांच्या शरीरात एचआयव्हीच्या निष्क्रियीकरणासोबतच ‘ब’ पेशींना एकत्रित करणाऱ्या (जेइरमलाईन) या पेशी नैसर्गिकरीत्या आढळून येतात, तर एचआयव्हीविरोधातील लस (औषधांच्या) निर्मितीत त्याचाच अंतर्भाव करण्यात आल्याचे टीएसआरआयचे विल्यम स्किफ यांनी सांगितले.
निष्क्रियीकरणाची प्रक्रिया करणारी प्रतिद्रव्ये प्रत्येकामध्ये आढळत असून शरीरातील अन्य रोगप्रतिकारक पेशींच्या तुलनेत रोगजनकांना विरोध करणाऱ्या ‘ब’ पेशींची निमिर्ती मोठय़ा प्रमाणात होत असते. तर संशोधकांनी केलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांमध्ये बहुतांश लोकांच्या शरीरात आढळणाऱ्या ‘ब’ पेशींना एकत्रित करण्याची प्रक्रिया लसीकरण केल्यानंतर होताना जवळपास एक दशलक्ष नव्या पेशींची निर्मिती झाल्याचे ला जोला संस्थेचे शेन क्रोट्टी यांनी म्हटले आहे. यासाठी संशोधकांनी सशक्त अशा रक्तदात्यांच्या रक्ताचे परीक्षण केले. तेव्हा नव्याने संशोधन करण्यात आलेले ईओडी-जीटी ८-६० एमईआर नामक प्रतिद्रव्यामुळे एचआव्हीवरील परिणामकारक ‘ब’ पेशीसारख्याच ‘व्हीआरसी ०१-वर्ग’ या पेशींची निर्मिती होत असल्याचे सिद्ध झाले आहे. हे संशोधन ‘विज्ञान’ या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiv aids
First published on: 01-04-2016 at 01:40 IST