होळी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. होळी हा सण प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा केला जातो, परंतु आता भारतातील सर्वच राज्यांमध्ये अगदी उत्साहात होळी आणि धूलिवंदन साजरे केले जाते. या दिवशी अनेक पक्वान बनवले जातात, मित्रपरिवारासोबत रंगपंचमीचा आनंद साजरा केला जातो.

भारतातील सर्वच सण जल्लोषात आणि उत्साहात साजरे केले जातात. इतर देशांनाही भारतातील संस्कृतीचे आणि सणांचे कौतुक वाटते. म्हणूनच की काय, अनेक देशांमध्ये भारतीय सण आपुलकीने साजरे होतात. याचप्रकारे होळी देखील अनेक देशांमध्ये साजरी केली जाते. तथापि, हा सण साजरा करायची पद्धत आणि वेळ भिन्न असू शकते. यावेळी १८ मार्च रोजी भारतात होळी खेळली जाणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया, इतर देशांमध्ये हा सण कसा आणि केव्हा साजरा केला जातो.

Indians are eligible for multi-entry Schengen visa for longer validity Why Changes in Schengen Visa Rules Matter
विश्लेषण : भारतीयांसाठी युरोपियन युनियनची भेट… शेंगन व्हिसाच्या नियमांमध्ये केलेले बदल महत्त्वाचे का?
international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?

Holi 2022 : जाणून घ्या, या होळीला तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणता रंग ठरणार भाग्यवान

नेपाळ :

नेपाळ हा भारताला लागून असलेला देश आहे. भारतातील सर्व सणांची झलक या देशातही पाहायला मिळते. येथे होळीचा सणही साजरा केला जातो. या सणाला फागू पुन्ही म्हणतात. एका महालात बांबूचा खांब टाकून फागू पुन्हीची सुरुवात झाली आणि हा उत्सव आठवडाभर चालला. इथे डोंगराळ भागात, भारताच्या होळीच्या एक दिवस आधी होळी साजरी केली जाते, तर, तराईची होळी भारतासोबत आणि अगदी भारतासारखीच साजरी केली जाते.

स्पेन :

टोमॅटिनो फेस्टिव्हल दरवर्षी ऑगस्टमध्ये स्पेनमधील बुनोल शहरात साजरा केला जातो. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. या उत्सवात हजारो लोक जमतात आणि टोमॅटोची होळी खेळतात. टोमॅटोची ही होळी भारताच्या होळीसारखीच आहे.

Holi 2022: होळी खेळताना स्मार्टफोन सोबत घेऊन जाता येत नाही? ‘या’ टिप्सचा वापर करून फोन ठेवा सुरक्षित

पोलंड :

पोलंडमध्ये होळीच्या वेळी अर्सीना सण साजरा केला जातो. यामध्ये नैसर्गिक रंग आणि फुलांपासून बनवलेल्या अत्तरांनी होळी खेळली जाते. हा परस्पर मतभेद विसरून एकत्र येण्याचा दिवस आहे. या दिवशी लोक एकमेकांना मिठी मारतात आणि या सणाच्या शुभेच्छा देतात.

मॉरिशस :

मॉरिशसमध्ये होळी साधारण महिनाभर चालते. वसंत पंचमीच्या दिवसापासून त्याची सुरुवात होते. येथे होलिका दहनही केले जाते. या होळीचा आनंद घ्यायचा असेल तर वसंत पंचमीच्या सुमारास मॉरिशसला जावे. होळीच्या निमित्ताने अनेक भागांत पाण्याचा वर्षावही केला जातो.

Holi 2022 : होळी खेळल्यानंतर नखं वाईट दिसतात? ‘या’ टिप्स वापरून काढा नखांमध्ये अडकलेला रंग

रोम :

रोममध्येही होळीचा सण साजरा केला जातो. येथील लोक मे महिन्यात हा सण साजरा करतात आणि लाकडे जाळून होलिका दहन करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लोक त्याभोवती नाचतात, रंग खेळतात आणि फुलांचा वर्षाव करतात.

आफ्रिका :

आफ्रिकन देशांमध्येही होलिका दहनाची परंपरा आहे. त्याला ओमेना बोंगा म्हणतात. या प्रसंगी लोक आपल्या देवतेचे स्मरण करून येथे अग्नी प्रज्वलित करतात आणि रात्रभर नाचत हा उत्सव साजरा करतात.

म्यानमार :

म्यानमारमध्ये मेकाँग किंवा थिंगयान नावाचा होळीसारखा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांवर पाण्याचा वर्षाव करतात. या पाण्याने सर्व पापे धुतली जातात असा त्यांचा विश्वास आहे. काही ठिकाणी रंग खेळून हा सण साजरा केला जातो.