अनेकजण मोजे वापरतात, काहीजण शूजमध्ये तर काहीजण घरात वावरतानाही मोज्यांचा वापर करतात. यात जुने किंवा फाटलेले मोजे काहीजण थेट डस्टबिनमध्ये फेकतात. पण फाटलेले मोजे फेकून देण्याआधी जरा थांबा. या फाटलेल्या मोज्यांचा तुम्ही पुन्हा वेगळ्या पद्धतीने उपयोग करु शकता.

अनेकजण फाटलेले मोजे सहज फेकून देतात कारण ते फार महान नसतात. पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची बचत करण्याची सवय असेल आणि गोष्टींचा पुर्नवापर करण्याची सवय असेल तर खालील युक्त्यांचा वापर करुन तुम्ही फाटलेले मोजे देखील पुन्हा वापरू शकता.

१) धूळ साफ करण्यासाठी

घरातील भिंतींवरील धूळ झाडूने सहज साफ करता येत नाही. तसेच फर्निचरसह इतर सजावटीच्या वस्तूंवरील धूळ काढण्यासाठी मऊ कापडाची आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही जुने मोजे वापरु शकता. काही मोजे मऊ आणि हलके असता ज्यामुळे साफसफाई योग्य प्रकारे केली जाते.

२) काच, विंडो ग्लास पॉलिश करण्यासाठी

काचेच्या खिडक्या आणि आरसे स्वच्छ ठेवणे अवघड काम असते. कारण त्यावर धूळ फार लवकर जमा होते. अनेक वेळा साफ करुनही त्यावर पाण्याचे डाग दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरातील काच नेहमी चमकदार ठेवण्यासाठी मोजे फायदेशीर ठरु शकतात. कापूस, लोकर, ३) सारख्या वस्तूंपासून बनविलेले हे मोजे धूळ आणि डाग सहजपणे दूर करतात.

३) कार स्वच्छ करण्यासाठी

जर तुमच्याकडे जुने मोजे असतील तर कार स्वच्छ करण्यासाठी वेगळा कापड शोधण्याची काळजी गरज नाही .कारण कारची काच साफ करून पॉलिश करण्यासाठी जुने मोजे हा उत्तम पर्याय आहे. अशाने साफसफाईनंतर गाडीवर कोणतेही डाग तुम्हाला दिसणार नाही.

४) तेलाची बाटली कव्हर करण्यासाठी

तेलाची बाटली गळकी नसली तरी तिच्या आजूबाजूला तेलकटपणा जाणवतो. यामुळे किचनच्या स्लॅब आणि कॅबिनेटवरही डाग पडतात, जे धुळीच्या संपर्कात आल्यानंतर खूप घाण आणि चिकट होतात. यामुळे तेलाची बाटलीही खूप चिकट होते. अशा परिस्थितीत जुने किंवा फाटलेले मोजे कापून तुम्ही ते तेलाच्या बाटलीला कव्हर बनवू शकता.

लक्षात ठेवा, जास्त मकळट आणि खराब झालेले मोजे पुन्हा वापरासाठी घेऊ नका.