Homemade Pickle : सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यात बाजारात मोठ्याप्रमाणात आंबे उपलब्ध होतात. यामुळे आंबा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जातात. पण उन्हाळ्यात पिकलेल्या आंब्यांसह कच्च्या कैरी देखील मोठ्याप्रमाणात उपलब्ध होतात. ज्यापासून कैरीचं पन्हं किंवा लोणचं बनवले जातेत. यात लोणचं बनवण्यासाठी उन्हाळा हा बेस्ट ऋतू मानला जातो. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे रेडीमेड लोणचं मिळते, जे तुमच्यापैकी अनेकजण विकत घेतात, पण तरीही घरी बनवलेल्या लोणच्याची चव काही औरच असते.
तिखट, चटकदार आणि मसालेदार कैरीचं लोणचं जेवणाची चव वाढवते. त्यामुळे कैरीच लोणचं वर्षभर जवळपास सर्वच घरांमध्ये खाल्ले जाते, पण घरच्या घरी कच्च्या कैरीचं लोणचं बनवण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात अनेक जातीच्या कैरी बाजारात मिळतात. पण लोणच्यासाठी योग्य कैरी कशी ओळखायची हे माहित असणे गरजेचे आहे, ज्यामुळे लोणचं चवीला एकदम उत्तम होते. पण या कैऱ्या कशाप्रकारे निवडायच्या जाणून घ्या.
१) कैरीची साल तपासून घ्या
लोणचे बनवण्यासाठी कच्ची कैरी घेताना त्याची साल तपासून घ्यावी. यासाठी बाजारातून फक्त जाड साल असलेल्या कैऱ्या खरेदी करा. जाड साल असलेल्या कैऱ्या खायला आंबट असतात, अशा कैऱ्यांपासून बनवलेल लोणचं जास्त काळ साठवता येते. अशा परिस्थितीत लोणचं खराब होण्याची काळजी करण्याची गरज नाही.
२) कच्च्या कैरीचा आकार
लोणच्याची कच्ची कैरी त्याच्या आकारावरूनही ओळखता येतो. कारण या कैऱ्या खाण्यायोग्य आंब्यापेक्षा किंवा पिकलेल्या पिवळ्या आंब्यांपेक्षा लहान आणि गोलाकार असतात. तसेच या कैऱ्यांचा रंग गडद हिरवा असतो. ज्या स्पर्श करताच हाताला टकण लागतात. अशा कैरी लोणच्यासाठी खरेदी करता येतात.
३) सुगंध घेऊन पाहा
गोड आणि आंबट आंब्याचा सुगंध वेगवेगळा असतो. त्यामुळे लोणच बनवण्यासाठी कैरी खरेदी करताना त्याचा सुगंध घेऊन पाहा. सुगंध जर गोड असेल तर अशा कैऱ्या लोणच्यासाठी योग्य नसतात. तुम्ही टेस्ट करुनही कैरीचा आंबटपणा तपासू शकता. लोणच्यासाठी नेहमी एकदम कच्च्या कैऱ्याच खरेदी करा.
४) तंतुमय कैऱ्यांची निवड करा
बाजारात अनेक प्रकारच्या कैऱ्या उपलब्ध आहेत, यात काही पल्पी तर काही तंतुमय असतात. अशा परिस्थितीत लोणच्यासाठी हिरवा आणि तंतुमय कैऱ्या खरेदी करा. यासाठी तुम्ही बाजारातील दुकानदाराला विचारु शकता. तुम्हाला ते लोणच्यासाठी योग्य प्रकारच्या कैऱ्या कोणत्या हे सांगू शकतात.
५) विविध जाती समजून घ्या
हिरव्या कच्च्या कैरीबरोबरच केंट आणि हेडेन्स जातीच्या कैऱ्या लोणचे बनवण्यासाठी वापरल्या जातात. या कैऱ्या तुम्हाला बाजारात सहज मिळतील, याशिवाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंब्यांची नावे वेगवेगळी आहेत. त्यामुळे लोणच्यासाठी त्यानुसारच कैऱ्यांची खरेदी करा.