कोणाला उचकी लागली की एखाद्या प्रिय व्यक्तीने त्या व्यक्तीची आठवण काढली असे आपण अगदी सहज म्हणून जातो. पण उचकी लागण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. थोडावेळ उचकी लागून ती थांबली तर ठिक आहे. पण ही उचकी थांबतच नसेल तर त्या व्यक्तीला आपण पाणी पिण्याचा सल्ला देतो. तरीही थांबत नसेल तर खडीसाखर खाण्यास सांगितले जाते. पण तरीही उचकी थांबत नसेल तर काही वेळा ही समस्या गंभीर असू शकते. त्यावर वेळीच योग्य ते उपाय करणेही आवश्यक असते. शरीरातील विशिष्ट प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नसल्याने ही समस्या उद्भवू शकते. पाहूयात उचकी लागल्यावर नेमके कोणते उपाय केल्यास ती थांबण्यासाठी उपयोग होतो.

१. श्वास रोखून ठेवा : श्वसनक्रियेत अडथळा आल्याने ही समस्या निर्माण होते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी श्वासाचे काही प्रयोग केल्यास त्याचा निश्चितच उपयोग होतो. एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. यामुळे फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरला जाऊन श्वसनाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होईल.

२. साखर : उचकी आल्यावर त्वरीत एक चमचा साखर खा. यामुळे शरीराचे कार्य सुरळीत होऊन उचकी थांबण्यास मदत होते. साखरेच्या पाण्यात थोडं मीठ टाकून ते थोडा थोडा वेळाने प्यायल्यास उचकी थांबण्यास मदत होते.

३. हळूहळू जेवा : अनेकवेळा वेगाने खाल्ल्यानेही उचकी लागू शकते. जेवताना हळूहळू आणि जास्त चावून खा. अनेकदा वेगाने खाल्ल्याने किंवा तिखट खाल्याने उचकी लागू शकते. मात्र जेवणाचा वेग कमी केल्याने ही उचकी कमी होऊ शकते.

४. काळे मिरे : तीन काळे मिरे आणि खडीसाखर तोडात ठेऊन ते चाऊन खाल्ल्यास त्याचा उचकी थांबण्यासाठी फायदा होतो. त्यावर एक घोट पाणी प्यायल्यास उपयोगी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. टॉमॅटो आणि पिनट बटर : उचकी आल्यावर ती पाणी पिऊन बराच वेळ थांबत नसेल तर टॉमॅटो दातांनी चावून खा. याशिवाय एक चमचा पीनट बटर खाणेही फायद्याचे होऊ शकते. यामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होईल आणि उचकी बंद होईल.