आजकाल अनेकांना थायरॉइडच्या समस्येने ग्रासले आहे. थायरॉइड ही मानेच्या खाली असलेली एक ग्रंथी आहे. जी आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून आपल्या थायरॉइड ग्रंथीवर नियंत्रण ठेवावे लागते. ही ग्रंथी जर नीट काम करत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपुरे पोषण, तणाव यांसारख्या कारणांमुळे थायरॉइड ग्रंथीमध्ये समस्या जाणवू लागतात. यादरम्यान शरीराचे वजन अचानक वाढणे, सुस्ती, थकवा, केस गळणे अशी लक्षणे दिसू लागतात. अनेक स्त्री-पुरुष, त्यांचे वय काहीही असो, जे आज थायरॉइडच्या समस्येने ग्रस्त आहेत. थायरॉइडचे मजबूत आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी, आपल्या दैनंदिन आहारात थायरॉइडच्या कार्यास मदत करण्यासाठी ओळखले जाणारे काही सुपरफूड समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी थायरॉइड ग्रंथींच्या आरोग्यासाठी पाच सुपरफूडचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. (सर्व प्रकारच्या थायरॉइड असंतुलनासाठी- हायपो, हायपर आणि ऑटो-इम्युन) ज्यामुळे तुम्हाला थायरॉइडच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. पण हे पाच सुपरफूड कोणते आहेत जाणून घेऊ….

१) आवळा

डॉ. भावसार यांच्या म्हणण्यानुसार, आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा आठपट जास्त आणि डाळिंबाच्या १७ पट जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे हे भारतीय फळ खरोखरच सुपरफूड दर्जास पात्र आहे. आवळा फक्त थायरॉइडसाठीच नाही तर केसांसाठी एक उत्तम औषध मानले जाते. आवळ्याच्या सेवनामुळे पांढरे केस, कोंडा यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय केसांचे कूप मजबूत करते आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते, केसांची वाढ सुधारते.

२) नारळ

थायरॉइड रुग्णांसाठी नारळ एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही. नारळामध्ये असलेले मीडियम चेन फॅटी ॲसिड (MCFAs) आणि मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स (MTCs)चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे थायरॉइड नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

उन्हातून घरी आल्यानंतर खूप थकवा, अंग गळून गेल्यासारखे वाटते? मग ‘या’ टिप्स फॉलो करा अन् व्हा रिफ्रेश

३) भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्यासाठी मदत करते. शरीरातील थायरॉइड संप्रेरकांचे संश्लेषण आणि संतुलनास राखण्यासाठीही मदत करते.

४) ब्राझील नट्स

ब्राझील नट्स हे सेलेनियमचा चांगला स्रोत आहे, जो शरीराला थायरॉइड संप्रेरकांच्या चयापचयासाठी आवश्यक आहे. यात अधिक पोषक तत्त्वे असल्याने दिवसातून तीन ब्राझील नट खाल्ल्यास तुमची थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

५) मूगडाळ

मूगडाळीत प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, त्यामध्ये फायबरचे प्रमाणदेखील जास्त आहे, जे तुम्हाला बद्धकोष्ठतेने ग्रस्त असल्यास फायदेशीर ठरू शकते, मूगडाळ उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ असल्याने ती थायरॉइड संप्रेरकांसाठी फायदेशीर ठरते, त्यामुळे मूगडाळीचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies for thyroid problem these 5 superfoods for thyroid health ayurvedic amla coconut sjr
First published on: 25-05-2023 at 12:09 IST