Home remedies to get rid of rats: उंदीर घरात शिरल्याने सगळ्यांनाच भीती वाटते. उंदरांच्या धुडगुसीमुळे घरातील वस्तुंचे नुकसान होतेच. शिवाय त्यांच्या विष्टेमुळे एक विचित्र प्रकारचा वास येऊ लागतो. तसेच यामुळे रोगराई देखील पसरते.अशा परिस्थितीत घरातून उंदीर काढून टाकणे खूप महत्वाचे होते. बरेच लोक घराबाहेर काढण्यासाठी रासायनिक उत्पादनांनी उंदरांना मारतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्या घरातही उंदरांनी दहशत निर्माण केली असेल, तर तुम्ही त्यांना न मारता सहजपणे घराबाहेर हाकलून लावू शकता. यासाठी आपण १० रुपयाच्या तुरटीचा वापर करून पाहू शकता. पण तुरटीचा नेमका वापर कसा करावा? जाणून घ्या.
तुरटी पावडर
घरातून उंदरांना पळवून लावण्यासाठी तुरटीचा सोपा उपाय करून पाहा. यासाठी बाजारातून १० रुपयाची तुरटी विकत घ्या, त्याची पावडर तयार करा. तयार तुरटीची पावडर घराच्या दाराजवळ शिंपडा. ज्या ठिकाणाहून उंदीर फिरला असेल, त्या ठिकाणाहून तुरटी पावडर शिंपडा. यामुळे उंदीर घरात शिरणार नाही, आणि घरी शिरलेला उंदीर घराबाहेर पळ काढेल.
तुरटीचा स्प्रे
उंदरांची दहशत कमी करण्यासाठी आपण तुरटीचा स्प्रे तयार करू शकता. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा, त्यात तुरटी पावडर भरून मिक्स करा, आणि तयार पाणी जिथे उंदीर दिसेल तिथे शिंपडा. या युक्तीमुळे काही मिनिटात उंदीर घरातून पळ काढतील.
पुदिना
उंदीर पळवण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता. खरंतर, उंदरांना त्याचा तिखट वास आवडत नाही. अशा परिस्थितीत, पुदिन्याचे तेल कापसाच्या गोळ्यात भिजवा. आता ते घराच्या कोपऱ्यात, कपाटात आणि स्वयंपाकघरात ठेवा. तुम्ही ते उंदरांच्या वाटेवर देखील ठेवू शकता. यामुळे उंदीर घरात प्रवेश करणार नाही
कांदा
कांद्याच्या वासापासून उंदीरही पळू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही कांदा कापून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवू शकता. मात्र, कांदा लवकर सुकतो. त्यामुळे दर २-३ दिवसांनी कांदा बदलत राहा. यामुळे तुमच्या घरात उंदीर अजिबात प्रवेश करणार नाहीत.
लाल मिरची
लाल मिरची देखील उंदीर दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. उंदरांना न मारता घरातून हाकलण्यासाठी तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता. यासाठी उंदरांच्या जागी तिखट किंवा सुकी तिखट ठेवा. यामुळे उंदीर घरातून पळून जातील.