मँचेस्टर विद्यापीठातील संशोधन
अंधत्व तसेच प्रसंगी मृत्यूच कारण ठरणाऱ्या बुरशीवर मध उपयोगी असते असे दिसून आले आहे. मधाच्या नव्या औषधी गुणधर्माचा शोध मँचेस्टर विद्यापीठातील श्रीमती झैन हबीब अलहिंदी यांनी घेतला आहे. सर्जीहनी नावाचे जैविक अभियांत्रिकीने युक्त असलेले मध तयार करण्यात आले असून ते फ्युसारियम या बुरशीला नष्ट करते.
या मधामुळे ऑक्सिजनचे विशिष्ट रेणू तयार होतात व ते मानवी शरीरातील बुरशीला मारून टाकतात. फ्युसारियम ही बुरशी मातीत व झाडांवर असते त्यामुळे माणसांनाही संसर्ग होतो. श्रीमती अलहिंदी यांनी केलेल्या संशोधनानुसार बुरशीचे या मधामुळे विघटन होते, त्यामुळे आगामी काळात उपचारात त्याचा उपयोग होणार आहे.
जुनाट संसर्ग काही वेळा जखमांमध्ये टिकून राहतो त्यामुळे माणसात ६०-८० टक्के संसर्गजन्य रोग होतात. बुरशी जखमांमध्ये राहतात, त्यावर प्रतिजैविकांचा वापर होतो. जैवआवरणामुळे हे सूक्ष्म टिकून राहतात व औषधांना दाद देत नाहीत. मधामुळे जैविक आवरणाचे विघटन करून सूक्ष्मजीवांचा नाश करता येतो हे आपण संशोधनातून दाखवून दिले आहे, अनेक बुरशीनाशकांपेक्षा मध जास्त चांगल्या प्रकारे काम करते याचे आश्चर्य वाटले, असे श्रीमती अलहिंदी यांनी सांगितले.
मँचेस्टर विद्यापीठाचे प्राध्यापक माल्कम रिचर्डसन यांच्या मते मधाचा वापर अनेक रोगांवर प्राचीन काळापासून केला जात आहे व बुरशीवर त्याचा गुणकारी उपयोग होतो हे या संशोधनातून प्रथमच स्पष्ट झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey effective on mildew infection
First published on: 15-02-2016 at 01:44 IST