Honor 9X Pro हा नवीन स्मार्टफोन बुधवारी भारतात लॉन्च झाला. हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये यापूर्वीच लॉन्च करण्यात आला होता. 21 मेपासून हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. केंद्र सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ई-कॉमर्स कंपन्यांना काही ठिकाणी सूट दिली आहे. त्यानुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या शहरात या फोनची विक्री करण्यात येईल.

कंपनीने Honor 9X Pro ची किंमत 17,999 रुपये ठेवली आहे. पण, प्री-बुकिंग करणाऱ्यांसाठी खास ऑफर आहे. प्री-बुकिंग करणाऱ्यांना हा फोन 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर 12 मेपासून प्री-बुकिंगला सुरूवात झाली असून ग्राहक या फोनसाठी 19 मेपर्यंत प्री-बुकिंग करु शकतात. कंपनीने ट्विटरद्वारे Honor 9X Pro च्या भारतातील लॉन्चिंगबाबत माहिती दिली.

अँड्रॉइड पायवर कार्यरत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Kirin 810 प्रोसेसर, पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, असे शानदार फीचर्स आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये कंपनीने गुगल प्ले स्टोअर दिलेले नाही. त्याऐवजी Huawei च्या अॅप्स आणि सर्व्हिस देण्यात आल्या आहेत. फोनमध्ये 6.59-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून Kirin 810 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येणे शक्य आहे. फोटोग्राफीसाठी Honor 9X Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तर, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे.