भयपटांमुळे मेंदूवरील भीती आणि काळजीचा परिणाम तपासण्यास मोठी मदत होत असल्याचे नुकत्याच शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानसिक रुग्णांवर उपचारांसाठीही नवे मार्ग खुले झाले आहेत.
रुग्णांना भीतीदायक प्रसंग आठवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कारण दैनंदिन जीवनासाठी ही आवश्यक माहिती असते. मात्र, अतिभीतीमुळे काळजी आणि इतर मानसिक आजारांना निमंत्रण मिळते, असे संशोधक सांगतात.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी भीतीदायक चित्रपट पाहिल्यामुळे मेंदूवर होणाऱ्या प्रक्रियेवर नुकतेच संशोधन केले आहे.
भीतीदायक चित्रपट पाहिल्यामुळे नऊ जणांच्या मेंदूंवर काय परिणाम झाले याचा अभ्यास या संशोधकांनी मांडला आहे. भीतीदायक प्रसंगामुळे मेंदूतील सर्व नसा मध्यभागी केंद्रित होतात.
आणि त्यामुळे ती व्यक्ती भावुक होते. भीतीदायक क्षणी मेंदूतील प्रमस्तिष्कखंड हा भाग कार्यान्वित होतो. त्यानुसार शरीरातील इतर प्रक्रिया घडतात, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.