Bathing with warm water tips: नोव्हेंबर महिना सुरू झाला की, हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागते. हिवाळ्यात सकाळी आंघोळ करणे हे खरं तर मोठं आव्हान. परिणामी, कोमट पाण्याने आंघोळ करणं ही एक सामान्य सवय आहे. थंड हवा आणि हिवाळ्याच्या हंगामात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला आराम आणि उबदारपणा मिळतो. मात्र, त्याचे त्वचेसाठी काय फायदे आणि काय नुकसान आहे हेदेखील या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ…

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

त्वचेवरील छिद्रे उघडतात– जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुमची त्वचेवरील छिद्रं हळूहळू उघडतात. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण प्रभावीपणे साफ होण्यास मदत होते

पीएच संतुलन– जर तुम्ही आधी गरम पाण्याने आंघोळ करायला सुरूवात केली असेल, तर त्याचा एक फायदा म्हणजे ते तुमच्या त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करते. तुमच्या त्वचेची पीएच पातळी राखल्याने तुमची त्वचा जलद बरी होण्यास मदत होते.

कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे

कोरडी त्वचा– सध्या हिवाळ्याइतकी कडक थंडी सुरू झालेली नाही. त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ सुरू केल्याने तुमची त्वचा कोरडी आणि डिहायड्रेट होऊ शकते. कधीकधी हा कोरडेपणा इतका तीव्र होऊ शकतो की त्वचेवर लोशन किंवा मॉइश्चरायझरही काम करणार नाही.

खाज सुटणे– जेव्हा त्वचा खूप कोरडी होते, तेव्हा खाज सुटणे सामान्य असते. जेव्हा त्वचेतील ओलावा कमी होतो तेव्हा त्वचेला खाज सुटते. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी ही समस्या आणखी गंभीर असते.

गरम पाणी वापरताना या गोष्टी लक्षात घ्या

जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर पाण्याचे तापमान कोमट असल्याची खात्री करा. कोमट पाण्यामुळे तुमच्या त्वचेला फारसे नुकसान होणार नाही. जास्त गरम पाणी हानिकारक असू शकते.