Natural Remedies For Diabetes : मधुमेह आज भारतातील एक सामान्य आजार झाला आहे. मधुमेह आता काही निवडक लोकांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध गटापर्यंत सगळ्यांमधेच हा आजार वाढत चालला आहे. त्यामुळे मधुमेह रोखण्यासाठी किंवा मधुमेह झाल्यावरही त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधेसुद्धा लिहून दिली जातात. पण, मधुमेह आजाराची लाट हळूहळू आपल्या शरीरात पसरते आणि तुमच्या ताकद, मनाचा शांतपणा, झोप यावर परिणाम करू लागते. पण, आयुर्वेदासारख्या भारतीय पारंपरिक पद्धती या आजारावर अधिक खोलवर जाऊन शोध घेतात आणि केवळ रक्तातील साखरेची पातळी नाही, तर शरीर व मनाच्या असुंतलनाचाही विचार करतात.
आयुर्वेदात डायबिटीजला मधुमेह म्हणतात. या शब्दाचा अर्थ ‘गोड लघवी’ असा होतो. कारण- मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या लघवीत साखर आढळते. त्यामुळे आयुर्वेदानुसार मधुमेह हा एक “मेटाबॉलिक-कफ दोषाचा विकार” (Metabolic-Kapha disorder) आहे. त्यामुळे आयुर्वेदात हा आजार फक्त रक्तातील साखरेच्या पातळीपुरता मर्यादित नसून एखाद्याचे पचन (अग्नी), आहाराची पद्धत, मनःस्थिती व शरीरातील एकूण ऊर्जा यांच्याशीही संबंधित आहे. म्हणजेच जेव्हा कफ दोष, वात, पित्त, कफ असंतुलित होतात तेव्हा मधुमेहासारखे आजार उद्भवतात.
कारले- कारल्यामुळे रक्तातील ग्लुकोज कमी होते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढते.
जांभूळ- काळ्या जांभळातील बिया साखरेचे शोषण कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात .
गुडमार- गुडमार ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. गुडमारमुळे तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही आणि स्वादुपिंडाच्या कार्याला त्यामुळे मदत मिळते.
विजयसार लाकूड- विजयसार लाकूड याला मराठीत पळस, असेही म्हणतात. हे एक आयुर्वेदिक झाड असून, ज्याचे लाकूड मधुमेह कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. तुम्ही या झाडाचे लाकूड रात्रभर पाण्यात ठेवावे आणि सकाळी त्या पाण्याचे सेवन करावे. हा एक घरगुती उपाय आहे.
त्रिफळ- त्रिफळ पाचक टॉनिक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पचन आरोग्य वाढते आणि चयापचय क्रियेत अडथळा ठरणारा कचरा शरीरातून काढून टाकते.
रात्री लवकर जेवणे, प्रक्रिया केलेले अन्न टाळणे आणि नियमित शारीरिक हालचाली यांसह मधुमेहासाठी हे नैसर्गिक उपचार सर्वांत प्रभावी ठरू शकतात. त्याचप्रमाणे हे नैसर्गिक उपाय तुमच्यावर उपचार नाही, तर तुमच्या जीवनशैलीत चांगले बदल घडवून आणतात.
मधुमेह टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दररोज अनुसरण केले पाहिजे?
- सूर्योदयापूर्वी उठा. त्यामुळे चयापचय शक्तीला चालना मिळते.
- मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या संतुलसानाठी ३० ते ४० मिनिटे योगासने आणि प्राणायाम म्हणजेच कपालभाती आणि अनुलोम विलोम नक्की करा.
- रिकाम्या पोटी मेथीसारख्या औषधी वनस्पतींसह कोमट पाणी प्यायला विसरू नका.
- निश्चित अंतराने आणि मनापासून जेवा.
आयुर्वेद शरीरावर लवकर नाही, तर हळूहळू उपचार करतो आणि त्यामुळे जीवनशैली सुधारण्यासही मदत होते. जर तुम्ही शरीराच्या संकेतांना ऐकून त्यांचे अनुसरण केले, तर आयुर्वेद तुम्हाला दीर्घकालिक आरोग्य आणि समतोल देऊ शकतो.