WhatsApp स्टिकर्स हे फीचर आल्यापासून शुभेच्छा देण्याची पद्धत बरीच बदललीये. स्टिकर्स येण्याआधी युजर्स मुख्यतः एखादा मेसेज किंवा फोटो फॉरवर्ड करुन शुभेच्छा द्यायचे. स्टिकर्सचं वैशिष्ट्य म्हणजे युजर आपल्या सोयीप्रमाणे स्टिकर्स कस्टमाइज करु शकतात आणि स्वतःचा फोटो किंवा सेल्फीला स्किटर बनवू शकतात. त्यामुळे आज ख्रिसमसनिमित्त तुमच्या प्रियजनांना खास अंदाजात शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुम्हाला WhatsApp स्टिकर्स बनवण्याची आणि सेंड करण्याची पद्धत सांगणार आहोत.

असे तयार करतात स्टिकर –
WhatsApp स्टिकर्स क्रिएट करणं सहजसोपं आहे. यासाठी सर्वप्रथम एक फोटो सिलेक्ट करा. त्या फोटोचं बॅकग्राउंड हटवून तुम्ही स्टिकर   बनवू शकतात.

-बॅकग्राउंड हटवण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरुन ‘Background Eraser’ हे अ‍ॅप डाउनलोड करा
-जो फोटो स्टिकर म्हणून वापरायचा असेल तो सिलेक्ट करा
-Background Eraser हे अ‍ॅप डाउनलोड करा आणि फोटो सिलेक्ट करा
-बॅकग्राउंड इरेज करा आणि फोटो सेव्ह करा
-स्टिकर पॅक बनवण्यासाठी तुम्हाला तीन फोटो सिलेक्ट कराव्या लागतील. तीनपेक्षा कमी फोटो असल्यास स्टिकर पॅक बनवता येत नाही.
-तीन स्टिकर क्रिएट केल्यानंतर पर्सनल स्टिकर अ‍ॅप डाउनलोड करा
-हे अ‍ॅप स्टिकरला आपोआप शोधतं, त्यानंतर Add हा पर्याय निवडा
-यानंतर WhatsAppमध्ये चॅट विंडो ओपन करा आणि स्टिकर सेक्शनमध्ये जा
-येथे तुम्ही जे स्टिकर्स क्रिएट केले असतील त्यावर टॅप करा
-सध्या हे फीचर केवळ अँड्रॉइड युजर्ससाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे सध्यातरी आयफोनच्या युजर्सना अँड्रॉइड युजरने पाठवलेलं स्टिकर     फॉरवर्ड करण्याशिवाय पर्याय नाहीये.