Side Effects Of Drinking Very Hot Drinks : कोणाला थंड, तर कोणाला अगदी गरमागरम चहा, कॉफी पिण्याची सवय असते. तुम्ही गरम पेय काही प्रमाणात थंड होण्याची वाट बघता; पण गरम पिण्याची सवय असणारा तुमचा मित्र बघता बघता चहा, कॉफीचा संपवून मोकळा होतो. चहा, कॉफी किंवा दुसरे कोणतेही पेय खूप गरम असताना त्याचे सेवन करत असाल, तर हा तुमच्या सवयीचा भाग आहे. पण, नेमक्या किती तापमानावर चहा, कॉफी बनवायची आणि सर्व्ह करायची, ज्यामुळे त्याची चव उत्तम लागेल. याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? नाही… तर याबाबत सगळ्यांची वेगवेगळी मते आणि वादविवादही आहेत. पण, या सगळ्यात सगळेच एक गोष्ट विसरून जातात ते म्हणजे आरोग्य. कारण- जास्त गरम पेय थेट कर्करोगाशीही संबंधित आहे.

गरम पेये आणि कर्करोग यांचा काय संबंध आहे? तर गरम पेयाचा घसा किंवा पोटाच्या कर्करोगाशी नाही, तर अन्ननलिकेच्या कर्करोगाशी खोलवर संबंध आहे. २०१६ मध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने सांगितल्याप्रमाणे ६५°C पेक्षा जास्त गरम पेय सतत प्यायल्यास कर्करोग होण्याची शक्यता (probably carcinogenic to humans) जास्त असते, असे आढळून आले आहे.

याचे वर्गीकरण तीन गटांत केले जाते…

१. घरात लाकूड जाळल्याने तयार होणारा धूर
२. जास्त प्रमाणात मांस खाणे
३. खूप गरम पाणी पिणे
आदी सवयी आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात.

एजन्सीच्या अहवालात असे आढळून आले की, अन्ननलिकेचा कर्करोग होण्यासाठी एखादा पदार्थ किंवा पेय नव्हे, तर तापमान जबाबदार असते. ही गोष्ट प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील पुराव्यांवर आधारित आहे. अभ्यासानुसार एक पारंपरिक औषध, पेय म्हणून ओळखला जाणारा मेट (mate) साधारणपणे ७०°C इतके गरम असताना सेवन केले जाते. जर असेच सेवन वारंवार अधिक प्रमाणात केले गेले, तर त्यामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

मध्य पूर्व, आफ्रिका व आशियातसुद्धा अशा प्रकारच्या अभ्यास करण्यात आला आणि खूप गरम पेये पिणे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याशी संबंधित आहे हे सिद्ध झाले आहे. आत्तापर्यंत युरोप आणि इतर पाश्चात्त्य देशांत या गोष्टींवर संशोधन करण्यात आले नव्हते. पण, या वर्षी, युनायटेड किंग्डममधील जवळजवळ अर्धा दशलक्ष प्रौढांवर कमी तापमान आणि जास्त तापमानाची कॉफी देऊन अभ्यास करण्यात आला. दिवसातून आठ किंवा त्याहून अधिक वेळा खूप गरम चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीला गरम पेये न पिणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता सहा पट जास्त असते.

गरम पाणी, कॉफी व चहामुळे कर्करोग कसा होतो?

संशोधकांनी जवळजवळ ९० वर्षांपूर्वी पहिल्यांदा एक मुद्दा मांडला होता. त्यामध्ये खूप गरम पेये प्यायल्याने अन्ननलिकेच्या अस्तरातील पेशींना नुकसान होऊ शकते आणि कालांतराने त्यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे मानले जाते.

गरम पेये अन्ननलिकेला कसे नुकसान पोहोचवू शकतात याबद्दल प्राण्यांच्या अभ्यासातून काही गोष्टी समोर आल्या आहेत…

पहिली बाब म्हणजे २०१६ मध्ये झालेल्या अभ्यासात ज्यामध्ये उंदरांना कमी आणि जास्त तापमानाचे पाणी देण्यात आले. कमी तापमानाचे पाणी दिलेल्या उंदरांच्या तुलनेत ७०°C तापमानाचे पाणी दिलेल्या उंदरांमध्ये अन्ननलिकेचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले.

दुसरी बाब म्हणजे अन्ननलिकेच्या आवरणाला उष्णतेमुळे नुकसान होते आणि तिची संरक्षण करण्याची क्षमता कमी होऊन जाते. पोटात गॅस्ट्रिक अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे (पोटातून) नुकसान होण्याचा धोका वाढतो. कालांतराने याचा परिणाम अन्ननलिकेचा कर्करोग होण्यावर दिसून येतो.

तुम्ही किती, कसे पाणी पिता हे महत्त्वाचे आहे का?

कर्करोगाचा धोका तुम्ही एकाच वेळी किती गरम आणि किती लवकर पाणी पिता यावर अवलंबून शकतो. असे दिसते की, एकाच वेळी जास्त गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे दुखापत होऊन अन्ननलिकेचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. एका अभ्यासात, संशोधकांनी वेगवेगळ्या तापमानात गरम कॉफी पिणाऱ्या लोकांच्या अन्ननलिकेतील तापमान मोजले. त्यांना असे आढळून आले की, पाणी किती गरम आहे यापेक्षा एखादी व्यक्ती पाण्याचा किती मोठा घोट घेते यावर अवलंबून आहे. ६५°C कॉफीचा खूप मोठा घोट (२० मिलिलिटर) अन्ननलिकेतील तापमान १२°C पर्यंत वाढवतो. त्यामुळे पेशींचे नुकसान होऊ शकते. ६५ अंश सेल्सिअस तापमानात अधूनमधून कॉफीचे लहान घोट घेतल्याने कर्करोगाची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते. पण, गेल्या काही वर्षांत, खूप गरम पेय जास्त प्रमाणात प्यायल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे.

मग चहा आणि कॉफी पिण्याचे सुरक्षित तापमान कोणते?

कॉफी बनवताना १००°C जवळपास म्हणजे जास्त तापमानावर उकळली जाते. उदाहरणार्थ- टेकअवे हॉट ड्रिंक्स कधी कधी खूप उच्च तापमानात सुमारे ९०°C दिल्या जातात, जेणेकरून लोक ऑफिसवरून घरी जाईपर्यंत काही प्रमाणातच कॉफी, चहा थंड होईल. अमेरिकेत कॉफीसाठी योग्य तापमान मोजण्यासाठी अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये अन्ननलिकेला उष्णतेमुळे होणारा त्रास आणि चव टिकवून ठेवण्याचा धोका लक्षात घेऊन, संशोधकांनी ५७.८°C हे योग्य आणि सुरक्षित तापमान असल्याचे शोधून काढले.

गरम पेय सुरक्षित पिण्याच्या टिप्स…

१. हळू चाला, कॉफी पिताना वेळ घ्या आणि मनापासून त्याचे सेवन करा.

२. खूप गरम पेय थंड होण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे आणि संशोधनातून असे दिसून आले आहे की, गरम पेयाचे तापमान पाच मिनिटांत १०-१५°C ने कमी होऊ शकते.

गरम पेय थंड करण्यास मदत करू शकणाऱ्या गोष्टी…

१) ढवळणे आणि फुंकणे
२) टेकअवे ड्रिंकवरील झाकण अर्धे उघडे ठेवणे. झाकण अर्धे बंद केलेली कॉफी झाकण लावलेल्या कॉफीपेक्षा दुप्पट लवकर थंड होते.
३) थोडे थंड पाणी किंवा दूध मिसळणे.

शेवटी तापमान तपासण्यासाठी लहान घोट घेणे ही एक चांगली कल्पना आहे. कारण- आपल्याला माहीत आहे की, मोठ्या प्रमाणात कॉफीचा घोट घेतल्याने अन्ननलिकेतील तापमानावर लक्षणीय परिणाम होतो आणि त्याच्या आवरणाला संभाव्य नुकसान होते.