Bathroom cleaning tips : आपण दररोज अंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वा भांडी घासण्यासाठी बाथरूमचा वापर करीत असतो. बाथरूम वापरून झाल्यावर अनेकदा फरशीवर पडलेले पाणी तसेच राहते. पाणी निघून जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. मात्र अशाने पाण्याचे पांढरट डाग त्या फरशीवर पडतात. तसेच, अनेकदा बाथरूमची फरशी बुळबुळीत होते.

वरचेवर जर ती फरशी घासली गेली नाही, तर मात्र हे पांढरे डाग किंवा बुळबुळीतपणा अधिक चिवट होत जातो. परिणामी बाथरूम घासताना ते साध्या खराट्याने निघत नाहीत. मग अशा वेळेस काय बरे करायचे? याची एक भन्नाट ट्रिक यूट्यूबवरील Puneritadka नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आली आहे. टॉयलेट-बाथरूम स्वच्छ करण्यासाठी आपण ज्या गोष्टी वापरतो, त्यांचाच वापर करून बाथरूमच्या फरशीवरील डाग कसे घालवायचे ते पाहा.

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे
kitchen cleaning tips things to avoid doing dishes
भांडी घासताना तुम्हीही वापरताय गरम पाणी? जरा थांबा; स्वच्छ, चमकदार भांड्यासाठी पाहा ‘या’ Tips
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू

हेही वाचा : Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…

बाथरूमच्या फरशीवरील डाग काढण्याचा उपाय

साहित्य

बाऊल
कपडे धुण्याची पावडर
‘हार्पिक’
पाणी
प्लास्टिक पिशवी
फरशी घासायचा ब्रश

कृती

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये किंवा नको असलेल्या प्लस्टिकच्या डब्यात दोन चमचे कपडे धुण्याची कोणतीही पावडर घ्या.
त्यामध्ये साधारण अर्धा किंवा एक चमचा खायचा सोडा मिसळून घ्या. दोन्ही गोष्टी बाऊलमध्ये चमचाच्या मदतीने व्यवस्थित मिसळून घ्या.
आता साबण आणि सोड्याच्या मिश्रणात सात ते आठ चमचे ‘हार्पिक’ द्रावण घालून घ्या. आता चमचाच्या मदतीने बाऊलमधील सर्व मिश्रण ढवळून घ्यावे.
मिश्रण ढवळण्यास सुरुवात केली की, सोड्यामुळे ते फसफसून वर येऊ लागेल. तेव्हा फरशी घासण्यासाठी साबणाचे मिश्रण तयार झाले, असे समजा.

हेही वाचा : kitchen tips : तव्यावरील चिकट-काळा थर १० मिनिटांत होईल साफ! ही ट्रिक एकदा पाहाच…

वापर :

  • तयार केलेल्या साबणाच्या मिश्रणात थोडेसे पाणी घालून, बाथरूमच्या फरशीवर जिथे पांढरट डाग आहेत किंवा बुळबुळीतपणा आहे तिथे हे मिश्रण घालून घ्यावे. आता त्यावर अंघोळीच्या तांब्याच्या मदतीने थोडेसे पाणी घालून घ्या. हातामध्ये प्लाटिकची पिशवी किंवा ग्लोव्हज घालून फरशी घासण्याच्या ब्रशने फरशी घासून घ्यावी.
  • बाथरूमची फरशी व्यवस्थित घासून झाल्यावर ती पाण्याने धुऊन घ्यावी.
  • अशा प्रकारे अगदी काही मिनिटांमध्ये आणि घरी साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींच्या मदतीने बाथरूमच्या फरशीवरील पांढरे डाग निघून जाण्यास मदत होईल. तसेच बुळबुळीतपणाही नाहीसा होईल.

यूट्यूबवरील @Puneritadka नावाच्या अकाउंटने शेअर केलेली ही सोपी आणि उपयुक्त अशी टीप तुम्हाला वाटल्यास तुमच्या घरच्या बाथरूममध्ये वापरून पाहू शकता.