Iron Cleaning Hacks : तुमच्यापैकी अनेकांना शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी इस्त्री केलेले कपडे घालायला आवडतात. कपड्यांना नीट इस्त्री नसेल, तर ते वापरावेसे वाटत नाहीत. पण, अनेकदा घाईघाईत इस्त्री करताना एखादा कपडा जळतो आणि तो इस्त्रीच्या प्रेस प्लेटवर चिकटतो. कधी कधी इस्त्री खूप गरम असल्यामुळे, तर काही वेळा चुकीची सेटिंग ठेवून कपड्यांना इस्त्री केल्यामुळे ही समस्या कधीही उद्भवू शकते.

पण, अशा चुकीमुळे इस्त्रीची प्रेस प्लेट खराब होते आणि त्यावर पडलेले काळे डाग तसेच राहतात, जे इस्त्री गरम झाल्यानंतर इतर कपड्यांना लागण्याची भीती असते. अनेक जण ते डाग सुरी किंवा धारदार ब्लेडने वगैरे घासून काढण्याचा प्रयत्न करतात; पण अशानेही इस्त्री खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्ही खालील काही सोप्या ट्रिक्स वापरून, काळे डाग पडून खराब झालेली इस्त्रीची प्रेस प्लेट काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.

इस्त्रीची जळालेली प्लेट काही मिनिटांत होईल स्वच्छ

तुम्ही बेकिंग सोडा आणि मेणबत्तीच्या मदतीने इस्त्रीची जळून काळी पडलेली प्रेस प्लेट स्वच्छ करू शकता.

१) मेणबत्ती
२) बेकिंग सोडा
३) व्हिनेगर
४) एक सुती कापड किंवा ब्रश

मेणबत्तीच्या मदतीने स्वच्छ करा इस्त्रीची खराब झालेली प्रेस प्लेट

१) सर्वप्रथम इस्त्री हलकीशी गरम करा.
२) इस्त्री जास्त गरम करू नका; फक्त ती मेण वितळेल इतकीच गरम करा.
३) आता एक जुनी मेणबत्ती घ्या आणि ती इस्त्रीच्या काळ्या झालेल्या प्रेस प्लेटवर हलक्या हाताने रगडा.
४) ज्या ठिकाणी इस्त्री खराब झालीय किंवा जेथे कपडा चिकटून बसलाय अशा ठिकाणी मेणबत्ती रगडा.
५) एक सुती कापडाचा तुकडा किंवा जुना टी-शर्ट घ्या आणि लगेच त्या गरम इस्त्रीवर फिरवायला सुरुवात करा.
६) अशा प्रकारे मेणासह इस्त्रीवरील काळे डाग किंवा चिकटलेला कपडाही निघेल.
७) शेवटी इस्त्रीची प्रेस प्लेट स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पूर्णपणे पुसून टाका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर

१) इस्त्री पूर्णपणे थंड होऊ द्या.
२) त्यानंतर एका भांड्यात २ टेबलस्पून बेकिंग सोडा व व्हिनेगर घाला आणि एकत्र मिसळा.
३) आता ही तयार केलेली पेस्ट प्रेस प्लेटवर लावा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या.
४) आता एक ओले सुती कापड किंवा मऊ ब्रश घ्या आणि हळुवारपणे इस्त्रीवर घासायला सुरुवात करा.
५) अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की, इस्त्रीची खराब झालेली प्रेस प्लेट हळूहळू स्वच्छ निघतेय.