How to Clean Stomach Remedy: आजच्या काळात पोट व पचनाशी संबंधित त्रास खूप सामान्य झाला आहे. आपण रोज खूप काही खातो-पितो; पण त्यामुळे शरीराला काय फायदा होतो आणि काय बाहेर टाकले जाते याकडे फार कमी लोक लक्ष देतात. अन्नातून मिळणारे पोषक घटक शरीराला ताकद देतात; पण जे अन्न नीट पचत नाही किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आतड्यांमध्ये कचऱ्यासारखे साचते. त्यामुळे पचनसंस्था कमजोर झाली की बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त (ॲसिडिटी) व अपचन असे त्रास लवकर वाढू लागतात.

राजस्थानचे प्रसिद्ध वैद्य जगदीश सुमन यांच्या मते, आतड्यांची नीट साफसफाई न झाल्यास मल आतच साचतो. हेच विषारी अपशिष्ट हळूहळू मोठ्या त्रासाचे कारण बनते. अनेकदा थकवा, आळस, त्वचेवर पुरळ उठणे, चेहऱ्याची चमक कमी होणे, डोकेदुखी, सततची बद्धकोष्ठता अशा त्रासांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण, हे साधे लक्षण नसून आतड्यांमध्ये साचलेल्या घाणीकडे इशारा करणारे संकेत आहेत.

आतड्यांमध्ये घाण का जमा होते?

आजच्या जीवनशैलीत फास्ट फूडचे प्रमाण खूप वाढले आहे. तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, जास्त मैदायुक्त किंवा तेलकट पदार्थ सेवन करण्यामुळे नीट न पचलेले अन्न आतड्यांमध्ये साचते. कालांतराने हे अन्न शिळे मल बनून आतड्यांना चिकटते. हे शरीरात वर्षभर राहू शकते. पोट साफ झाल्यासारखे वाटले तरी हा मल हळूहळू सडतो आणि शरीरात विषारी पदार्थ (टॉक्सिन) तयार करतो. त्यामुळे त्वचेवर पुटकुळ्या येणे, थकवा येणे, पचनाचे त्रास, गॅस, पोट फुगणे अशा तक्रारी वाढतात.

आतंड्याची स्वच्छता

जेव्हा आतडी पूर्णपणे स्वच्छ असतात तेव्हा शरीराला योग्य पोषण मिळते. आतड्यांतील विषारी पदार्थ बाहेर गेले तर रक्त शुद्ध राहते, पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्यामुळे ऊर्जा वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते. स्वच्छ आतडी अनेक आजारांपासून आपले संरक्षण करतात.

आतड्यांतील अशुद्धता आजारांना कारणीभूत

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील अनेक त्रासांचे मूळ आतड्यांमध्ये साचलेली घाण आहे. त्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होणे, वारंवार त्वचारोग होणे, श्वासाला दुर्गंध येणे, सतत आळस जाणवणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही सगळी लक्षणे शरीरात साचलेल्या विषारी पदार्थांमुळे (टॉक्सिन) होतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळोवेळी आतड्यांची नैसर्गिक साफसफाई होणे गरजेचे आहे.

आतड्यांच्या स्वच्छतेसाठी घरगुती उपाय

आतड्यांमधून घाण काढून टाकण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चिमूटभर काळे मीठ मिसळा. या पाण्याची चव थोडी खारट असली पाहिजे. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यावर आतड्यात जमलेली सगळी घाण निघून जाईल. हा उपाय अगदी सहज आणि पैसे खर्च न करता येतो.