Home Made Tips To clean Tea strainer : स्वयंपाकघरात सकाळ, संध्याकाळ चहाच्या गाळणीचा वापर केला जातो. यामुळे चहा आणि दूध गाळून झाल्यानंतर चहापावडर किंवा दुधाचे कण तर डागांनी चहाची गाळणी अगदी घाणेरडी दिसू लागते. वारंवार धुतल्यानेही डाग निघून जात नाहीत. जर तुमच्याही स्वयंपाकघरातील चहाचा गाळणी खराब झाली असेल असेल तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी, तुम्ही जास्त प्रयत्न न करता नव्यासारखी ती चमकवू शकता.
बेकिंग सोडा आणि गरम पाणी
तुम्ही बेकिंग सोडा आणि गरम पाण्याचा वापर करून चहाची गाळणी सहजपणे स्वच्छ करू शकता. यासाठी प्रथम एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा सुद्धा घाला. चहाची गाळणी १५ ते २० मिनिटे त्यात भिजवून ठेवा. नंतर, ब्रशने स्वच्छ घासून घ्या. अशा प्रकारे, तुम्ही चहाची गाळणी सहज स्वच्छ करू शकता.
लिंबू आणि मीठ
तुम्ही चहाचा गाळणी स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मीठ देखील वापरू शकता. अर्धा लिंबू कापून त्यावर थोडे मीठ शिंपडा. चहाची गाळणीवर लिंबू घासून घ्या. काही मिनिटांतच, साचलेली घाण सहजपणे निघून जाईल. जर गाळणी स्टीलची असेल तरच हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
भांड्यांचा साबण आणि कोमट पाणी
जर तुम्ही दररोज चहाच्या गाळणीचा वापर करत असाल, तर तुम्ही भांड्यांचा साबण आणि कोमट पाण्याने ती सहज स्वच्छ करू शकता. हा सर्वात सोपा उपाय आहे. पण, तुम्हाला दररोज गाळणी स्वच्छ धुवावी लागेल. सुरवातीला गाळणी कोमट पाण्यात भिजवा आणि थोडा वेळ तसेच ठेवून द्या. काही वेळाने, भांड्यांचा साबण लावून ब्रशने स्वच्छ करा. यामुळे चहाची गाळणीतील घाण सहजपणे निघून जाईल.
