Health Tips : उन्हाळ्यात मधुमेह आणि डिहायड्रेशनचा सामना कसा करावा?; वाचा डॉक्टरांनी दिलेल्या खास टिप्स

मधुमेह आणि डिहायड्रेशन या समस्येला कसे थांबवावे, शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये द्रवपदार्थ कसे राहतील याची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

How to deal with diabetes and dehydration in summer
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना अधिक वेळा लघवी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते.

डिहायड्रेशन आणि मधुमेह अनेक वेळा एकत्र दिसून येतात. ज्यावेळी प्रखर सूर्यप्रकाश असतो आणि उष्णता जास्त असते अशावेळी अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते. तथापि, मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि रक्तात जास्त प्रमाणात साखर गाळण्यासाठी आणि शोषून घेण्यासाठी जेव्हा तुमच्या मूत्रपिंडाला अतिरिक्त काम करावे लागत असेल, तेव्हा मधुमेह होतो.

जर तुमची मुत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असेल तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे शरीराच्या बाहेर टाकली जाते, ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते. याचा परिणाम म्हणजे, यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना अधिक वेळा लघवी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. तर मग मधुमेह आणि डिहायड्रेशन या समस्येला कसे थांबवावे आणि शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये द्रवपदार्थ कसे राहतील याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, हे आज आपण जाणून घेऊया.

‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश

मॅक्स रुग्णालयाच्या प्रमुख मधुमेह प्रशिक्षक, डॉक्टर शुभदा भनोत म्हणतात, ”मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो कारण रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक प्रमाणामध्ये द्रवपदार्थांचे सेवन करून डिहायड्रेशनवर उपाय केला जाऊ शकतो. तथापि, खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले असेल तर, वैद्यकीय सल्ला घेऊन तुम्हाला अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) दिले जाऊ शकतात.”

कडक उन्हाळ्यात शरीरातील पाणी व्यवस्थित राखण्यासाठी काही सामान्य सूचना

  • द्रव पदार्थांचे सेवन:

अधिक पाणी पिऊन अथवा कॅफिन नसलेले पेय जसे नारळाचे पाणी, साधे ताक किंवा साखर विरहित लिंबू पाणी पिऊन शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवता येते. मद्यपान कमीत कमी करावे कारण दारू निर्जलीकरण करते.

Photos : रात्री लवकर जेवण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का?

  • उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याबाबत जागरूक राहणे:

मधुमेह असणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याचा धोका अधिक असतो आणि उष्णतेशी संबंधित परिस्थितीला ते संवेदनशील असतात. मधुमेह संबंधित कोणत्याही गुंतागुंतीचा परिणाम, घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर होऊ शकतो ज्यामुळे शरीर योग्यरीत्या थंड होत नाही. यामुळे उष्माघात आणि उष्णतेचा थकवा येऊ शकतो, जे फार गंभीर ठरू शकते.

चक्कर येणे, मोठ्या प्रमाणात घाम येणे, स्नायूंना पेटका येणे, बेशुद्ध होणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे आणि उलटी होणे ही सर्व थकव्याची लक्षणे आहेत. या लक्षणांच्या बाबतीत जागरूक असणे अत्यावश्यक आहे, थंड ठिकाणी जावे, भरपूर प्रमाणात पेय सेवन करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा. काही नेहमीच्या वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे सुद्धा डिहायड्रेशन होऊ शकते.

  • रक्तातील साखरेच्या प्रमाणावर सतत लक्ष ठेवणे:

वैद्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे सतत शरीरातील साखरेचे प्रमाण तपासात राहावे. फ्रीस्टाइल लीबरसारख्या स्मार्ट सीजीएम यंत्राच्या मदतीने आपण बोटाला सुई न टोचता, साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवू शकतो. अतिउष्णतेमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते त्यामुळे खूप जास्त उष्णता असेल त्यादिवशी साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे.

सततच्या आंबट ढेकरमुळे हैराण आहात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे मिळेल आराम

  • थंड ठिकाणी व्यायाम करावा:

गरमीमध्ये बाहेर पळायला जाण्यापेक्षा वातानुकूलित व्यायाम शाळेत ट्रेडमिलवर धावावे. अथवा सकाळच्या थंड वातावरणामध्ये घराबाहेर व्यायाम करावा.

डिहायड्रेशन हा सर्वांसाठी काळजीचा विषय आहे. मधुमेह व डिहायड्रेशन त्यांच्या एकत्रीकरणामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. बाहेर कितीही गरमी असली तरीही डिहायड्रेशन टाळण्यासाठी काही साध्या उपाययोजना करून आपण आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवू शकतो आणि निरोगी व आनंदी राहू शकतो.

(अधिक माहिती करिता आपल्या आरोग्य तज्ञांशी संपर्क करावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to deal with diabetes and dehydration in summer read the special tips given by the doctor pvp

Next Story
आरोग्यवार्ता : खंडित निद्रा विकाराने स्मृतीवर दुष्परिणाम
फोटो गॅलरी