आपण आपला जास्तीत जास्तवेळ ऑफिसमध्ये व्यतित करतो. अनेकांसाठी ऑफिस हे जणू दुसरं घरच असतं. पण ऑफिसमध्ये काम करताना कधी कळत तर कधी नकळत तणाव येतो. कामाच्या दबावाने किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी खटके उडाले की हा तणाव अधिकच वाढत जातो. कामाचं टार्गेट आणि त्यात असणारं डेडलाईनचं प्रेशर यामुळे हा ताण दिवसेंदिवस वाढत जातो. यामुळे होणारी चीडचीड, वरिष्ठांकडून केली गेलेली खरडपट्टी, कामातील अडचणी याचा परिणाम आपल्यावर होतो. याचा मनावर ताण येतो. तेव्हा ऑफिसमध्ये सतत होणारं फ्रस्ट्रेशन कसं हाताळाल यासाठी काही सोप्या टीप्स आहेत. जेणेकरून तुम्ही ऑफिसच्या तणावपूर्ण वातावरणात मन शांत ठेवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– ऑफिसमध्ये अनेकदा आपले सहकाऱ्यांशी खटके उडतात, अशावेळी हा वाद न वाढवता, शांत राहण्याचा प्रयत्न करा. अनेकदा चूक आपली नसते तेव्हा का ऐकून घ्यावं? असा अॅटीट्यूड अनेकांचा असतो. पण इगो, अॅटीट्यूड बाजूला ठेवून कमीत कमी वाद होतील असं बघा.
– कोणत्याही गोष्टीवर टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा यातून सुवर्णमध्ये निघतोय का? याचा विचार करा.
– आपण जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये असतो तेव्हा ऑफिस हे अनेकांसाठी दुसरं घरच आहे. कुटुंबियांपेक्षा आपण अधिक वेळ सहकाऱ्यांसोबत घालवत असतो तेव्हा आपल्या सहकाऱ्यांशी शक्य तितकं जमवून घेण्याचा प्रयत्न करा.
– प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका कारण यातून ताण आणखी वाढत जातो. काही विषय तिथल्या तिथे सोडून द्या.
– तुम्ही समोरच्या व्यक्तीला जशी वागणूक द्याल तशीच वागणूक तो तुम्हालाही देईल, तेव्हा सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा.
– ऑफिसमध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींवर पटकन प्रतिसाद देण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती समजून घ्या आणि मग प्रतिसाद द्या.
– कोणत्याही सहकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नका किंवा इतर कोणालाही ते करू देऊ नका.
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राग आलाच तर दीर्घ श्वास घ्या.
एखाद्या गोष्टीचा त्रास आपण करून घेतला तर त्रास होणार. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या गोष्टींचा अनेकदा मनावर ताण येतो. पण काही साध्या सोप्या गोष्टी केल्यात तर ऑफिसमध्ये येणारे फ्रस्ट्रेशन नक्कीच कमी होऊ शकतं.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to deal with frustration at workplace
First published on: 14-07-2017 at 10:00 IST