How To Dry Jeans In Rain : पावसाळा आणि ओले कपडे हे गणित कधी न सुटण्यासारखेच आहे. कारण – पावसाळ्यात विशेषतः जीन्ससारखे जाड कपडे वाळवण्यास खूप त्रास होतो. कधी कधी कपडे ओले राहिल्यामुळे भयानक वास येऊ लागतो. काही जण इस्त्री करून कपडे सुकवण्याचा प्रयत्न करतात; पण त्यांचा ओलसरपणा जात नाही. ओले कपडे तसेच वापरल्यामुळे आपल्याला जंतुसंसर्गही होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही पावसाळ्यातही काही खास पद्धतींनी कपडे वाळवू शकता.
धुतल्यानंतर कपडे लगेच पसरवा – पावसाळ्यात कपडे धुतल्यानंतर लगेच ते पसरवून ठेवा. नाही तर मग त्यातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत जीन्स हवेशीर ठिकाणी पसरवून ठेवा. त्यामुळे त्यातील ओलावा हळूहळू कमी होईल.
हीटरचा वापर करा – पावसाळ्यात आपण कधी कपडे सुकवण्यासाठी ऊन पडतंय याची वाट पाहत असतो. अशा परिस्थितीत कपडे सुकविण्यासाठी तुम्ही हीटर, पंखा किंवा ड्रायरचा वापर करू शकता. त्यामुळे जीन्स आणि इतर कपडे सहज सुकण्यास मदत होते आणि त्यांना वाससुद्धा येत नाही.
बेकिंग सोडा वापरा – तुम्ही आधी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि मग जीन्स धुऊन घ्या. त्यामुळे त्यात जीवाणू निर्माण होत नाहीत आणि वाससुद्धा येत नाही.
हँगर्स वापरा – जीन्ससारखे जाड कपडे सुकविण्यासाठी तुम्ही हँगर्सचा वापर करू शकता. जीन्स सुकण्यासाठी नेहमी उलटी टांगून ठेवा. त्यामुळे पाणी सहज खाली गळून जाऊ शकेल आणि जीन्स लवकर सुकण्यास मदत होईल.
जीन्स गुंडाळून ठेवू नका – ओल्या जीन्स जास्त वेळ दुमडून किंवा गुंडाळून ठेवू नका. त्यामुळे त्यातील ओलावा तसाच राहतो आणि मग वास येत राहतो. जीन्स धुतल्यानंतर दोरीवर पसरवून ठेवा.