व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या जीवनाचा एक भाग झालं आहे. अगदी छोट्या ते मोठ्या प्रत्येक कामासाठी सध्या आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहोत. लॉकडाउनमुळे याचा वापर अनेक ऑफिशियल कामासाठी लागणारा संवाद साधण्यासाठीही केला जात आहे. या व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला कोणी त्रास दिला, कोणी चुकीचे मेसेज पाठवले किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला सहज ब्लॉक करू शकता. तसंच समोरची व्यक्तीही आपल्याला ब्लॉक करू शकते. परंतु आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणी ब्लॉक केलं आहे हे मात्र पटकन लक्षात येऊ शकत नाही. अनेकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीचं इंटरनेट बंद आहे असंच वाटतं. पण आता तुम्हाला आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का हे समजू शकणार आहे.

कसं शोधून काढाल?

जर कोणी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहता येणार नाही. त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रोफाईल फोटो देखील आपल्याला दिसणार नाही. पण यात असे होऊ शकते की त्या व्यक्तीने आपला प्रोफाईल फोटो काढलेला असेल तर आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे लक्षात येणार नाही.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
how to shave underarm hair know the 5 easy steps to shave armpit
काखेतील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करताय? मग ‘या’ चार गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा…
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

ब्लू टिक-डबल टिक

या शिवाय तुम्ही अन्य प्रकारेही आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. तुम्ही पाठवलेल्या संदेशाला एकच टिक येत असेल आणि कधीच डबल टिक आली नाही तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. कारण दोन टिक तुमचा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला आहे याची खात्री करतात.

व्हीडिओ कॉलचा पर्याय

या गोष्टींवरूनही ब्लॉक केलं आहे की नाही हे लक्षात आलं नाही तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध असलेला व्हिडिओ कॉल हा ऑप्शन वापरून बघा. जर आपला व्हिडिओ कॉल लागत नसेल तर, याचा अर्थ तुम्हाला समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे.

जर आपल्याला वरील सर्व सूचक दिसले तर याचा अर्थ असा होऊ शकतो की समोरच्या वापरकर्त्याने आपल्याला ब्लॉक केले आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव, जेव्हा कोणी आपल्याला ब्लॉक करते तेव्हा व्हॉट्सअॅप आपल्याला अलर्ट पाठवत नाही. “जेव्हा आपण एखाद्यास ब्लॉक करता तेव्हा आम्ही आपल्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी हेतूपूर्वक अलर्ट पाठवत नाही”, असं WhatsApp कडून सांगण्यात येतं.