व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या जीवनाचा एक भाग झालं आहे. अगदी छोट्या ते मोठ्या प्रत्येक कामासाठी सध्या आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहोत. लॉकडाउनमुळे याचा वापर अनेक ऑफिशियल कामासाठी लागणारा संवाद साधण्यासाठीही केला जात आहे. या व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला कोणी त्रास दिला, कोणी चुकीचे मेसेज पाठवले किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला सहज ब्लॉक करू शकता. तसंच समोरची व्यक्तीही आपल्याला ब्लॉक करू शकते. परंतु आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणी ब्लॉक केलं आहे हे मात्र पटकन लक्षात येऊ शकत नाही. अनेकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीचं इंटरनेट बंद आहे असंच वाटतं. पण आता तुम्हाला आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का हे समजू शकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसं शोधून काढाल?

जर कोणी आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केले असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहता येणार नाही. त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रोफाईल फोटो देखील आपल्याला दिसणार नाही. पण यात असे होऊ शकते की त्या व्यक्तीने आपला प्रोफाईल फोटो काढलेला असेल तर आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे लक्षात येणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to find out if you have been blocked by someone on whatsapp ttg
First published on: 08-07-2021 at 14:26 IST