अनेक राज्यांमध्ये पावसाने आता दमदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता लोक घराला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. अनेक लहान कौलारू किंवा पत्र्यांच्या घरात पावसाळ्यात छतातून पाणी गळते. अशा वेळी पाणी रोखण्यासाठी घरात अनेक ठिकाणी बादल्या आणि भांडी ठेवावी लागतात, या गळणाऱ्या छतांमुळे पावसाळ्यात घरात राहावेसे वाटत नाही. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगत आहोत, ज्या फॉलो करीत तुम्ही गळणारे छत सहज दुरुस्त करू शकता.

छताला किती मोठा क्रॅक गेला आहे समजून घ्या

छताला ज्या ठिकाणी क्रॅक गेले आहे किंवा जिथून पाणी गळतेय तिथे नेमका किती मोठा क्रॅक आहे समजून घ्या. यामुळे छत गळतीच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल. तसेच क्रॅक किती मोठा आहे त्याच्या आधारे सोल्युशन निवडा. जर छताला मोठा क्रॅक असेल तर तो भरण्यासाठी तुम्हाला एक्स्पर्टची गरज भासेल. पण क्रॅक छोटा असेल तर तो तुम्हीदेखील तो भरू शकता.

छत दुरुस्त करण्यापूर्वी करा हे काम

छतातून पाणी गळत असेल तर क्रॅक गेलेला भाग दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण भाग कोरडे करून घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण ओल्या छतावर क्रॅक भरण्यासाठी लावलेली कोणतीही गोष्ट व्यवस्थित सेट होत नाही. अशा वेळी आपण क्रॅक गेलेला भाग सुकविण्यासाठी फॅन वापरू शकता.

छतावरील क्रॅक भरण्यासाठी सिमेंटचा वापर केला जातो. पण हे काम पेट्रोलने जास्त चांगल्या पद्धतीने करता येते. यासाठी सिमेंटमध्ये पेट्रोल आणि थर्माकोलचे तुकडे मिसळा. हे काही वेळाने पेस्टमध्ये बदलेल. आता ते छताच्या खराब झालेल्या भागावर लावा. दोन ते तीन तास सुकायला ठेवा. हे संपूर्ण काम करताना हातमोजे घालायला विसरू नका. लहान मुलांना त्यापासून दूर ठेवा.

हॉटेलमध्ये चेक-इन केव्हाही केले तरी चेक-आऊट दुपारी १२ वाजताच का करावे लागते? वाचा हॉटेलचे नियम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेंटिंगमुळे दिसणार नाही दुरुस्ती

जर क्रॅक फारच लहान असेल तर आपण त्या ठिकाणी पेंट करून ती जागा होती त्या स्थितीत पुन्हा तयार करू शकता. डॅमेज झालेला भाग पेट्रोलने तयार केलेली पेस्ट लावून भरल्यानंतर तो भाग पेंट करा. तुम्ही पेंटिंग करीत असताना क्रॅकवर झालेली पेस्ट पूर्ण सेट झाली आहे का, हे आधी तपासा.