Natural Home Remedies For Bed Bugs : पावसाळ्यात ओलसरपणामुळे घरात विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामुळे घरातील अंथरुण आणि फर्निचरचे मोठे नुकसान होते. लाकडी फर्निचरमध्ये ओलाव्यामुळे वाळवी आणि ढेकूण वाढण्याची सर्वाधिक भीती असते. घरात एकदा का ढेकूण झाले तर ते घरातील बेड, गाद्या आणि अंथरुणांमध्ये पसरत जातात. ढेकणांमुळे फक्त घर खराब होत नाही तर अनेक आरोग्य समस्याही निर्माण होतात. यात त्वचेवर खाज येणे, एलर्जी आणि झोपण्यास त्रास अशा समस्या वाढत जातात. या ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता, ज्याने घरभर पसरलेले ढेकूण अगदी सहज दूर होतील.

ड्रायर, व्हॅक्यूम क्लिनरचा करा वापर

ढेकणांपासून सुटका मिळवण्यासाठी बेड, गाद्या आणि उशा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. यासाठी गाद्या, उशा आणि अंथरुण गरम पाण्याने व्यवस्थित धुवून स्वच्छ करा. यानंतर हाय टेम्परेचरवर ड्रायरने सुकवा. यानंतर फर्निचर, गादी, उश्या व्हॅक्यूम क्लिनरने साफ करा. यानंतर व्हॅक्यूम बॅग काढून लगेच बाहेर फेकाद, जेणेकरून ढेकूण पुन्हा येणार नाहीत.

स्टिम क्लिनिंगची घ्या मदत

स्टिम क्लिनिंगच्या मदतीनेदेखील तुम्ही ढेकूण मारू शकता. स्टिम क्लिनिंगच्या उच्च तापमानात ढेकूण आणि त्याची अंडी जिवंत राहू शकत नाही. गादी, सोफा, उश्यांवर स्टिम क्लिनर चालवून ढेकूण मारू शकता.

ढेकूण मारण्यासाठी घरातच तयार करा स्प्रे

अर्धा चमचा लाल तिखट
एक चमचा थिनर
चुना पावडर
डिटर्जंट पावडर
आमचूर पावडर

ढेकूण मारण्याचा स्प्रे कसा बनवायचा

१) सर्वप्रथम एका भांड्यात थिनर घ्या.
२) त्यात लाल तिखट टाकून मिक्स करा.
३) नंतर चुना पावडर, डिटर्जंट आणि आमचूर पावडर मिक्स करा.
४) सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तयार लिक्विड एका स्प्रे बाटलीत भरा.
यानंतर तुम्ही ते घरातील बेड, विविध फर्निचरवर आणि गाद्यांखाली स्प्रे करा.
याप्रकारे तुम्ही घरातून ढेकूण कायमचे नाहीसे करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढेकणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

१) घरातून ढेकूण घालवण्यासाठी बेडच्या कडांवर हळद पावडरदेखील शिंपडू शकता.
२) व्हिनेगर फवारणी करूनही तुम्ही घरात पसरलेले ढेकूण नष्ट करू शकता.
३) ढेकणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जमल्यास घरातील बेड आणि गाद्या सूर्यप्रकाशात ठेवा.
४) तुरटी आणि दालचिनीचा वापर करूनदेखील तुम्ही घरातील ढेकूण पळवू शकता.