Aluminium Foil Hack : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे ट्रेंड व्हायरल होत असतात. यात सध्या असा ट्रेंड व्हायरल होतोय ज्यात लोक त्यांच्या बाल्कनीत अॅल्युमिनियम फॉइल ठेवताना दिसतायत. पण हा कोणता नवीन फॅशन ट्रेंड नाही तर स्मार्ट हॅक आहे. पण हा स्मार्ट हॅक नेमका कशासाठी केला जातोय जाणून घेऊ…

अनेक लोक बाल्कनीमध्ये अॅल्युमिनियम फॉइल पसरवून टाकताना दिसत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे पक्ष्यांना दूर ठेवणे. विशेषतः कबुतरांना बाल्कनीपासून दूर ठेवण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे.

कबुतरांना पळवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा जुगाड

घराच्या बाल्कनीत आणि खिडक्यांमध्ये कबूतर मोठ्या प्रमाणात घाण करुन ठेवतात. अशाने काम तर वाढतेच शिवाय आजारपणही येते. यामुळे घराच्या बाल्कनीपासून कबूतरांना दूर ठेवण्यासाठी लोक अॅल्युमिनियम फॉइलचा जुगाड करत आहे.

अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा चमकदारपणा कबूतरांना आवडत नाही, वाऱ्याबरोबर अॅल्युमिनियम फॉइल हलते आणि त्यावर प्रकाश परावर्तित होतो. ही चमक पाहून कबुतर घाबरतात, त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि ते बाल्कनीपासून दूर राहतात.

काही लोकांचा असा विश्वास आहे की, कबुतरांना अॅल्युमिनियम फॉइलवर चालणे किंवा बसणे आवडत नाही, म्हणून ते अशा ठिकाणी जाणे टाळतात. वारा वाहतो तेव्हा अॅल्युमिनियम फॉइल हलते आणि आवाज करते, ज्यामुळे कबुतरांना अस्वस्थ वाटू लागते. हे अद्याप वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही की अॅल्युमिनियम फॉइलचा हा जुगाड कबुतरांना पळवून लावण्यास मदत करत आहे असे म्हटले जातेय.