देशात थेट ब्रॉडकास्ट सॅटेलाइट सेवा पुरवणारी टाटा स्काय सध्या उत्सवाचे दिवस पाहता धमाका ऑफर देत आहे. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत एचडी (हाय डेफिनिशन) सेट टॉप बॉक्स मोफत दिला जात आहे. मात्र, हा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

धमाका ऑफर अंतर्गत तुम्हाला टाटा स्कायचा एचडी सेट टॉप बॉक्स पूर्णपणे मोफत मिळू शकतो. परंतु तुम्हाला या ऑफरसाठी चार हजार रुपये भरावे लागणार आहे. त्यानंतर संपूर्ण रक्कम त्याच्या टाटा स्काय खात्यात जोडली जाईल. या पैशातून तुम्ही तुमच्या आवडत्या वाहिन्या पाहू शकणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती

एचडी सेट टॉप बॉक्स मोफत कसा मिळवायचा?

सर्वप्रथम ग्राहकांना फक्त एकदा चार हजार रुपये पेमेंट करावे लागेल. यानंतर टाटा स्कायचे खाते सक्रिय होईल, ज्यात कंपनीकडून तितक्याच रुपयांचे मूल्य (चार हजार) जोडले जाईल. पुढे, तुमच्या पॅक/चॅनेलच्या मासिक योजनेसाठी तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी, या चार हजार रुपयांमधून रक्कम कापली जाईल. या ऑफरमध्ये चांगली गोष्ट अशी आहे की जोपर्यंत ही रक्कम चालू राहील, तोपर्यंत वापरकर्त्याला रिचार्ज करण्याचीही गरज भासणार नाही. तथापि ऑफर अंतर्गत प्राप्त झालेले मूल्य केवळ मासिक पॅकवरच रिडीम केले जाऊ शकते. ते सहामाही आणि वार्षिक रिचार्जवर वैध असणार नाही.

ही देखील एक ऑफर आहे

याशिवाय टाटा स्काय आणखी एक ऑफर देत आहे, ज्या अंतर्गत हा बॉक्स १४९९ मध्ये घेता येईल. यामध्ये महिन्याभराची पॅकची रक्कम समाविष्ट नाही आणि तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. तसे, या ऑफरमध्ये एक कूपन कोड उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना १५० रुपयांची सूट मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन कनेक्शनही घेता येईल

टाटा स्काय कनेक्शन ऑनलाइन मिळविण्यासाठी, तुम्हाला tatasky.com या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्ही तुमचे नाव आणि नंबर इत्यादी तपशील देऊन ही प्रक्रिया पाच टप्प्यांमध्ये (तुमच्याबद्दल, कनेक्शन, पॅक, पेमेंट आणि इंस्टॉलेशन) पूर्ण करू शकता.