व्हॉट्सअपवर रंगणार गप्पाचा फड… व्हिडिओ कॉल झाले अपडेट; जाणून घ्या कसं कराल अ‍ॅक्टीव्हेट

इतर व्हिडिओ कॉल अॅपला टक्कर देण्यासाठी फिचर अपडेट करण्यात आलं

ग्रुप कॉलची सध्याची चारची मर्यादा आता वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅप प्रयत्न करत आहे. लवकरच तुम्हाला या फिचरच अपडेट येऊ शकतं. सध्या Android आणि iOS च्या बीटा व्हर्जनवरही सुविधा सुरू आहे. Zoom App च्या वाढता प्रभाव लक्षात घेऊन व्हाट्सअॅपनं हे पाऊल उचललं आहे.

या नव्या अपडेटसंदर्भात WAbetainfoने आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली आहे. या नव्या अपटेडमुळे व्हॉट्सपच्या युझर्सच्या गप्पांचा एकप्रकारे फड रंगणार आहे. नव्या अपडेट फिचरच्या साह्यानं व्हॉट्स अॅप Google Duo, Hangouts , Meet , Zoom आणि इतर व्हिडिओ कॉलिंग अॅपला टक्कर देणार आहे.

अँड्रॉयडसाठी व्हॉट्स अॅपच्या v2.20.133 या बीटा व्हॅर्जनमध्ये तर आय़फोनसाठी v2.20.50.25 या बीटा व्हर्जनमध्ये नवीन अपडेट सुरू आहे. सध्या फक्त बीटा व्हर्जन असणारे युझर्सच या नव्या अपडेटचा लाभ घेऊ शकतात. आगामी काही दिवसांमध्ये सर्वांसाठी हे फिचर सुरू होणार आहे. नव्या अपडेटसाठी बीटा व्हर्जन असणाऱ्या युजर्सला आपलं व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. TestFlight app डाउनलोड करून आयफोन युजर्स बीटा व्हर्जन वापरू शकतात.

https://www.apkmirror.com/apk/whatsapp-inc/ या वेबसाइटवर जाऊन तुम्ही 2.20.133 हे बीटा व्हर्जन घ्या. त्यानंतर आठ जणांना व्हिडिओ कॉल तुम्ही करू शकता. किंवा गुगुल प्ले स्टोरवरून 2.20.133 बीटा व्हर्जन डाउनलोड करा.

व्हॉट्स अॅपवर ग्रुप ओपन करा. त्यानंतर कॉलचं बटन दाबा. त्यानंतर तुम्हाला कॉल करायचाय त्यांची नावं सिलेक्ट करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: How to get up to 8 people on a whatsapp video call nck

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या