Home gardening tips : अनेकांना बागकामाची आवड असते. फुलांपासून ते स्वयंपाकघरात उपयोगी असणाऱ्या रोपांची लागवड घरात अगदी आवडीने आणि हौसेने केली जाते. स्वयंपाकात पदार्थाची चव वाढविणारी कोथिंबीर बाहेरून आणल्यावर अगदी एका दिवसात खराब होते किंवा वाळून जाते. मात्र, घरातच तुम्हाला दररोज ताजी आणि कोवळी कोथिंबीर मिळाली, तर ते अधिक सोईचे होईल नाही का?

घरच्या घरी कोथिंबीर कशी लावायची आणि तिची काळजी कशी घ्यायची यासाठी यूट्युबवरील MaziRecipeMaziBaag नावाच्या चॅनेलने कोथिंबीर लागवडीबाबत काही सोप्या अन् महत्वाच्या टिप्स व्हिडीओमधून दिलेल्या आहेत. त्या पाहा आणि वाटल्यास घरच्या घरी हा प्रयोग करून पाहा.

हेही वाचा : Garden tips : उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ काय? रोपांच्या वाढीसाठी पाहा ‘१०’ टिप्स

घरी कोथिंबीर लावताना या सहा गोष्टी लक्षात ठेवा

१. कोथिंबिरीची लागवड करण्याआधी :

कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी जुन्या धण्यांचा अजिबात वापर करू नका. त्याऐवजी ताजे किंवा नवे धणे वापरावेत. तुम्ही जर जुन्या धण्याचा वापर केलात, तर त्यामध्ये रुजवण क्षमता कमी असते. परिणामी कोथिंबीर नीट उगवणार नाही किंवा त्या लागवडीचे हवे तसे परिणाम दिसणार नाहीत.

नवीन धणे कुंडीमध्ये टाकण्याआधी ते हातावर चांगल्या रीतीने मळून घ्यावेत. धण्याचे दोन भाग होईपर्यंत ते हातावर मळून घ्यावेत. हातावर मळून घेतलेले धणे कुंडीत लावण्याआधी किमान दोन तास तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत.

२. धणे मातीत लावण्याची व पाणी देण्याची पद्धत :

आता दोन तास पाण्यात भिजवून घेतलेले हे धणे कुंडी वा मातीमध्ये एका ओळीत किंवा एकत्रित पुंजका पद्धतीने लावून घ्या. आता लागवड केलेल्या धण्यांना अंकुर फुटून, कोथिंबीर उगवू लागली की, झारीच्या मदतीने आरामात पाणी द्या. तसेच, उगवलेल्या कोथिंबिरीला आवश्यकतेनुसार किंवा साधारण एक दिवसाआड पाणी द्यावे.

हेही वाचा : Garden tips : गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा घरी कशा उगवायच्या? पाहा ही सोपी हॅक

३. कोथिंबीर उगवल्यानंतर घ्यावयाची काळजी

कोथिंबीर लागवड केलेली कुंडी वा ती जागा जास्त सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी असू नये. दिवसभरातून साधारण एक तासभर ऊन मिळाले तरीही कोथिंबिरीसाठी ते पुरेसे होते. त्यामुळे कोथिंबिरीची कुंडी त्याप्रमाणे स्वयंपाकघरात किंवा बाल्कनीत ठेवावी.

कोथिंबिरीचे स्वरूप लहान असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खत घालू नका. मात्र, तुम्ही कोथिंबीर ज्या मातीमध्ये लावणार आहात, ती माती कंपोस्ट खत किंवा शेणखतमिश्रित असावी. तसेच त्या मातीमधून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या.

जेव्हा तुम्हाला कुंडीतील कोथिंबीर वापरायची असेल तेव्हा केवळ तिची पाने तोडून घ्यावीत. त्यामुळे त्याच कुंडीत कोथिंबिरीचे रोप पुन्हा नव्याने वाढण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अतिशय सोप्या, मात्र तेवढ्याच महत्त्वाच्या टिप्स घरात कोथिंबिरीची लागवड करताना लक्षात ठेवा.