How to grow mustard greens in pots, Easy: आजच्या काळात होम गार्डनिंग करण्याची आवड खूप लोकांमध्ये वाढत आहे. अनेक जण आपल्या बागेत विविध प्रकारची फुले आणि भाज्या आनंदाने पिकवतात. जर तुम्हालाही बागकामाची आवड असेल, तर तुम्ही तुमच्या बागेत किंवा टेरेसवर अगदी सहजपणे मोहरीची भाजी लावू शकता. ही भाजी केवळ चवीला उत्कृष्ट नसून, आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.

  • मोहरीची भाजी लावण्यासाठी आवश्यक तयारी

१. योग्य कुंडी निवडा

मोहरीची भाजी लावण्यासाठी सर्वांत आधी योग्य कुंडी निवडणे आवश्यक आहे. तुम्ही साधारण २० ते २५ सेंटीमीटर उंचीची कुंडी निवडू शकता. कुंडी फार मोठी नसली तरी चालेल, कारण मोहरीची मुळे खोलवर जात नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुंडीच्या तळाशी पाणी साचु नये म्हणुन छिद्र करुन घ्या. या छिद्रामुळे कुंडीमध्ये पाणी साचून राहत नाही, ज्यामुळे रोपांना बुरशी लागण्याचा धोका कमी होतो.

२. माती तयार करा

मोहरीची भाजी चांगली वाढण्यासाठी माती योग्य प्रकारे तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या शेतातील किंवा बागेतील साधी माती वापरू शकता. ही माती अधिक सुपीक बनवण्यासाठी, त्यात काही गोष्टी मिसळणे आवश्यक आहे. माती अधिक सुपीक बनवण्यासाठी, त्यात गांडूळ खत मिसळावे. हे खत मातीला आवश्यक पोषण पुरवते. तसेच, माती भुसभुशीत ठेवण्यासाठी त्यात बारीक वाळू मिसळावी. जर तुम्हाला जुने शेणखत मिळाले, तर ते मातीसाठी आणखी उत्तम ठरेल. हे सर्व घटक मातीत व्यवस्थित मिसळून घ्या, जेणेकरून रोपांना उत्कृष्ट वाढ मिळेल.

३. कुंडीत मोहरीचे रोप कसे वाढवायचे ?

कुंडीमध्ये माती तयार झाल्यानंतर, आता मोहरीची बी लावण्याची वेळ येते. बी मातीमध्ये थेट टाकण्यापूर्वी हलकेसे भिजवून घ्यावे. कारण- यामुळे बीज लवकर अंकुरित होते आणि त्याची वाढ लवकर होते. त्यासाठी तयार केलेल्या मातीमध्ये एक ते दोन सेंटीमीटर खोल खोदून ते २-३ सेंटीमीटर अंतरावर ठेवा.

४. अशी घ्या रोपाची काळजी

रोप उगवल्यानंतर त्याला हलके पाणी द्या. पाणी खाली साचू नये याची काळजी घ्या. रोपाला आठवड्यातून २-३ वेळा पाणी देणे आवश्यक आहे. त्या रोपाला दर १५ दिवसांनी खत द्या. कीटकांना दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी कडुलिंबाचे द्रावण वापरा.