Eye Strain Relief Tips : सध्याच्या आधुनिक जगात टीव्ही, स्मार्टफोन्स व लॅपटॉप बघितल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही. अशा गोष्टींचा सातत्याने वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांवर प्रचंड ताण येत असतो, डोळे दुखतात, डोळ्यांतून पाणी सुद्धा येते. डोळ्यांच्या कमकुवतपणासाठी इतर अनेक कारणे जबाबदार असू शकतात. अपूर्ण झोप, अयोग्य आहार आणि जीवनशैली देखील आपल्या डोळ्यांचे शत्रू ठरतात. आपल्या आहारात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंक यासारख्या शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असेल तर डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते. तसेच धूळ, प्रदूषण आणि मधुमेह, थायरॉईड सारख्या काही आजारांमुळे डोळे कमकुवत होऊ लागतात. तर नक्की यावर उपाय काय करायचा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

कॉनलोनयेइन्स्टिट्यूटच्या मते, डोळ्यांची कमजोरी दूर करण्यासाठी मधाचे सेवन खूप प्रभावी ठरते. मधात असे गुणधर्म आहेत जे डोळ्यांची जळजळ कमी करू शकतात, संसर्गापासून वाचवू शकतात आणि दृष्टी कमकुवत होण्याची शक्यता कमी करू शकतात. मधात दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे डोळ्यांना नुकसान होण्यापासून वाचवू शकतात आणि डोळ्यांच्या समस्यांचा धोका कमी करू शकतात.त्याचबरोबर जर तुम्ही अश्वगंधा आणि मध यांचे एकत्र सेवन केले तर तुम्हाला आणखीन जास्त फायदे मिळू शकतात.

अश्वगंधाचे वर्णन एक रसायन म्हणून केले आहे; जे बुद्धिमत्ता, शक्ती आणि डोळ्यांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. एका अभ्यासानुसार, अश्वगंधामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे रेटिनाच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास उपयुक्त ठरतात. अश्वगंधा वात, कफ दोषांचे संतुलन राखते. आयुर्वेदानुसार, जेव्हा हे दोष असंतुलित असतात तेव्हा डोळ्यांच्या शक्तीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. या औषधी वनस्पतीचे सेवन केल्याने थकवा कमी होतो आणि ताण नियंत्रित होतो. त्याचे सेवन केल्याने रक्त परिसंचरण सुधारते, डोळ्यांच्या पेशींना पोषण देते, ज्यामुळे दृष्टी सुधारते. अश्वगंधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म डोळ्यांच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. यामुळे मोतीबिंदूसारख्या वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांची शक्यता कमी होऊ शकते.

मध आणि अश्वगंधाचे सेवन कसे करावे?

५ ग्रॅम अश्वगंधा घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिसळा आणि दररोज त्याचे सेवन करा. १५ दिवसांत तुमची दृष्टी सुधारेल आणि तुमचे डोळे निरोगी राहतील. या दोन गोष्टींमुळे अंधुक दृष्टी सुधारेल आणि शरीरही निरोगी राहील. या दोन औषधी वनस्पतींचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि आजार टाळता येतील.