How To Keep Coriander Fresh: बाजारात हिरवीगार कोथिंबीर बघितली की पटकन विकत घ्यायची इच्छा होते ना? पण एवढी कोथिंबिर घेऊन ठेवायची कुठे आणि खराब झाली तर पैसे वाया जाणार हा विचार डोक्यात येतो. बरं म्हणून मोजकी कोथिंबीर घ्यावी तर भाजीवाल्या एक- दोन काड्यांचे महाग भाव लावतात. अशावेळी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे कोथिंबिरीची जुडी घ्यायची आणि ती अगदी १५ दिवस टिकेल अशी भरून ठेवायची. आता अर्थात हे शक्य असतं तर आतापर्यंत केलं नसतं का? कदाचित तुमची पद्धत चुकत असेल. आज आपण काही स्मार्ट गृहिणींच्या टिप्स पाहणार आहोत ज्याने तुम्हीही निदान दोन आठवडे कोथिंबीर फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता.

१५ दिवस कोथिंबीर राहील फ्रेश, फक्त..

  • जेव्हा तुम्ही कोथिंबीर बाजारामधून आणता, तेव्हा त्याची पाने तोडून कोथिंबीर निवडावी.
  • कोथिंबीर ठेवण्यासाठी एक डबा घेऊन त्यात थोडे पाणी घाला. त्यात एक चमचा हळद टाका. या पाण्यामध्ये निवडलेली कोथिंबीरीची पाने भिजवा.
  • कोथिंबीर त्या पाण्यामधून धूवून काढल्यावर ती सुकवून घ्यावी.
  • कोथिंबीरची पाने मऊ कापडाने किंवा टिश्यू पेपरने स्वच्छ करून घ्या.
  • डबा नीट कोरडा करून त्यात खाली टिश्यू ठेवून वर कोथिंबीर ठेवावी.
  • हा डबा कोरड्या जागी ठेवावा.
  • दुसरा पर्याय म्हणजे आपण एक स्वच्छ काचेच्या बरणीत अर्धे पाणी घ्या.
  • बाजारातून आणलेली कोथिंबीर मोकळी करून खराब झालेली पाने बाजूला करा,दांडे मोडू नका.
  • कोथिंबीरीचे देठ पाण्यात बुडवून ठेवून ही बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्या.

हे ही वाचा<< २ मिनिटात लसूण सोलण्यासाठी वापरा ‘या’ २ सोप्या टिप्स! स्वयंपाकाचा वेळ होईल अर्ध्याहून कमी

दरम्यान आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, डायबिटीज ते कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्यांवर कोथिंबीर उत्तम औषध ठरू शकते. कोथिंबीर जेवणाचा स्वादही वाढवते आणि पचनही वेगवान होते. वर दिलेल्या पद्धतींशिवाय तुम्ही काही खास हॅक तयार केली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा.