Belly Fat Loss : सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहे. दिवसभर एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे वजनवाढीची समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजनवाढीमध्ये प्रामुख्याने पोटावरीस चरबी खूप लवकर वाढते. ही चरबी कशी कमी करावी, हे सुद्धा एक मोठे आव्हान असते. तुमच्या पोटावर चरबी वाढली आहे का? टेन्शन घेऊ नका, आज आम्ही तु्म्हाला एक हटके उपाय सांगणार आहोत.
इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फक्त चार आठवड्यात पोटावरील चरबी कशी कमी करायची, हे सांगितले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की फिटनेस ट्रेनर पंक्ती शाह तुम्हाला चार व्यायाम सांगताना दिसत आहे. हे व्यायाम कसे करायचे ते सुद्धा त्या या व्हिडीओमध्ये करुन दाखवत आहेत. पहिला व्यायाम करताना डाव्या हाताचे कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला लावायचे आहे तर उजव्या पायाचे कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला लावायचे आहे. असे ६० वेळा तिनदा करायचे आहे.
दुसरा व्यायाम करताना दोन्ही हाताचे बोटे डोक्याला लावायचे आहे आणि डाव्या हाताचे कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला आणि उजव्या हाताचे कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला लावायचे आहे. हा सुद्धा व्यायाम ६० वेळा तिनदा करायचा आहे.
तिसरा प्रकारचा व्यायाम करताना खाली वाकून डावा पायाच्या बोटाला उजवा हाताचे बोट लावायचे आणि उजव्या पायाच्या बोटाला डाव्या हाताचे बोट लावायचे आणि नंतर सरळ उभे राहायचे आणि दोन्ही हात वर करायचे. हा व्यायाम २५ वेळा चार वेळा करायचा.
शेवटच्या प्रकारचा व्यायाम करताना डावा पाय समोर आणि उजवा पाय मागे न्यायचा आणि डाव्या पायाच्या बोटांना उजव्या हाताची बोटे लावायचा प्रयत्न करायचा आणि उजव्या पायाबरोबर सुद्धा असेच करावे. हा व्यायाम ३० वेळा तिनदा करायचा. हे सर्व व्यायामाचे प्रकार समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.
हेही वाचा : हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा का होतो? तज्ज्ञ सांगतात, थंडीच्या दिवसांत केसांची कशी घ्यावी काळजी ….
फिटनेस ट्रेनर पंक्ती शाह यांनी pankti._.yogic या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम व्यायाम”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान वर्कआउट आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती सांगितली.” आणखी एका युजरने फिटनेस ट्रेनलविषयी लिहिलेय, “खूप छान फिटनेस आहे”