आंबट-गोड दही सर्वांनाच खायला आवडते. काही लोक दही चपाती, पराठा, साबूदाना खिचडी, भातासह खातात तर काही लोकांना साखर टाकून फेटलेले नुसते दही खायला आवडते. याशिवाय दहिपूरी, दहीवडा, कढी या हे पदार्थ तयार करण्यासाठी देखील दही वापरतात. काही लोक दही विकत आणतात तर काही लोक घरीत दही लावतात. दही लावण्यासाठी सहसा दुधामध्ये १ चमचा दह्याचे विरजण घालून किण्वण प्रक्रिया केली जाते ज्यानंतर घट्ट दही तयार होते. घाईच्या वेळी जर घरात दही नसेल तर विरजन लावता येत नाही अशा वेळी दही लावण्यासाठी सोपी ट्रिक तुमच्या कामी येईल. चला तर मग जाणून घेऊया दह्याचे विरजण न लावता दही कसे लावावे?

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ वापरून तुम्ही झटपट दही लावू शकता. दही लावण्यासाठी विरजण लावण्याऐवजी तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. स्वयंपाक घरात मिरचीही असतेच त्यामुळे ऐनवेळीही तुम्ही दही लावू शकता. मिरची वापरून दही कसे लावावे ही ट्रिक सांगणार व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, sagarskitchenofficial या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर आहे.

हेही वाचा – तुम्हाला मोमोज खायला आवडतात का? फॅक्टरीमध्ये कसा तयार होतो तुमचा आवडता पदार्थ, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – मगरीजवळ जाणे तरुणाला पडले महागात; मगरीने अचानक हल्ला केला अन् जबड्यात…पाहा थरारक व्हिडीओ

व्हिडीओमध्ये दह्याचे विरजन लावून आणि मिरची वापरून दही कसे लावावे दाखवले आहे. मिरची वापरून दही कसे लावावे हे आपण जाणून घेऊ या. सर्वप्रथम दूध गरम करून व्यवस्थित थंड करा. दूध व्यवस्थित थंड झाले आहे ना तपासून घ्या.दुधावर आलेली साय काढू नका तशीच राहू द्या.
त्यानंतर एका भाड्यात थंड दूध घ्या. नंतर स्वच्छ धूवून घेतलेली मिरचे देठ काढा. मिरचीचे देठ आणि मिरजी दोन्ही दुधात टाका. गरमीमध्ये ते तुम्ही कुठेही ठेवू शकता पण थंडीमध्ये कापडात गुंडाळून कोपऱ्यात ठेवा. झाकण लावून १०-१२ तास तसेच राहू द्या मग छान घट्ट दही लागेल. मिरची वापरून लावलेले दही आंबट नसते.