How To Make Kharvas At Home Recipe Video: उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्वी जेवणं झाली की छान मातीच्या भांड्यात बनवलेला खरवस खाल्ला जायचा. घरोघरी बनणारा खरवस आता लाल रंगाचं प्लास्टिक अंथरलेल्या गाड्यांवर मिळतो खरा पण त्यात तो अस्सल पोत काही सापडत नाही. फार फार तर त्या मऊ, गोड पांढऱ्या पदार्थाला मलाई वगैरे म्हणता येईल. खरवस घरी कसा बनवायचा हे साधारण अनेकांना माहित असेल. नुकत्याच बाळंत झालेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून खरवस तयार केला जातो. पण इथे शहरात आता व्यायलेल्या गायी म्हशी शोधायला कुठल्या गोठ्यात जायचं हा प्रश्नच आहे. आता काही ही शोधाशोध करायची गरज नाही, कारण थोडा जुगाड करून आपणही घरीच छान जाळीदार व घट्टसर खरवस बनवू शकता. मास्टरशेफचा स्पर्धक व प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर युट्युबवाला सॅम याने आपल्याबरोबर खास विना चिकाच्या खरवसाची रेसिपी शेअर केली आहे. चला पाहूया..

साहित्य

  • १ वाटी दूध (उकळलेलं)
  • १ वाटी कंडेन्स मिल्क
  • १ वाटी दही
  • साखर- वेलचीची पूड (चवीनुसार)
  • १ चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी मिसळून केलेली घट्टसर पेस्ट

कृती

सुरुवातीला १ वाटी तापवलेले दूध, १ वाटी कंडेन्स मिल्क व १ वाटी दही एकत्र करून घ्या. आपल्याला हे तिन्ही पदार्थ नीट फेटून घ्यायचे आहेत. दह्यामध्ये असणाऱ्या गुठळ्या किंवा घट्टसरपणा काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. उलट यामुळेच खरवस छान जाळीदार व्हायला मदत होऊ शकते. मग यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर व चिमूटभर साखर पूड घालून घ्या. जास्त साखर वापरू नका कारण आपण हे कंडेन्स मिल्क घेतले आहे जे अगोदरच गोड असते.

how to make dahi vada at home recipe
Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
For Making Dahi Which Milk Is Best Where To Store Curd
एक वाटी दुधानेही बनेल घट्ट दही, फक्त बनवताना ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा! योग्य तापमान, दूध, भांडं कसं असावं?

यामध्ये आपण मैदा किंवा कॉर्न फ्लोअरची पेस्ट घालून घ्या व नीट मिसळून घ्या ज्यामुळे हे दाटसर मिश्रण तयार होईल. हे तयार मिश्रण एका लहान डब्यात काढून घ्या, आता आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचे आहे.

शिजवण्यासाठी

एका टोपात पाणी, त्यात एक वाटी उपडी ठेवून मग वर मिश्रण घातलेला डब्बा ठेवा व १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
मध्यम आचेवर हे मिश्रण वाफवून घ्या, मध्ये मध्ये झाकण उघडून पाहण्याची गरज नाही कारण एकदा ती वाफ निघून गेली की मग खरवस नीट शिजत नाही. थेट १५ मिनिटांनी झाकण उघडा व त्यात टूथपिक किंवा साधी सूरी घालून पाहा. जर हे मिश्रण चिकटलं नाही तर आपला खरवस तयार आहे समजा.

वाटल्यास थोड्यावेळ हा खरवस आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करू शकता ज्यामुळे त्याचा पोत आणखी छान होईल. आणि मग सगळ्यांनी मिळून यावर ताव मारा.

हे ही वाचा<< कैरीच्या चटपटीत लोणच्यात तेलाचं योग्य प्रमाण किती घ्यावं? कैरी चिरताना ‘हा’ नियम पाळाच, पाहा Video

तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. लोकसत्ताच्या ‘इन्फ्लूएन्सर्सच्या जगात’ या विशेष सीरीजमध्ये अलीकडेच सॅमने आपल्याबरोबर ही रेसिपी शेअर केली होती. रेसिपीसह अन्यही कुकिंग सिक्रेट्स सॅमने सांगितले आहेत ते पाहण्यासाठी हा मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा व अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सविषयी जाणून घेण्यासाठी ‘इन्फ्लूएन्सर्सच्या जगात’ ही सीरीज नक्की फॉलो करा.