धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वेळ वाचण्यासाठीच्या टिप्स आणि जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी चपाती, पुरी आणि पराठा कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता पण हे बनवण्यासाठी फार वेळ लागतो. रोज चपाती, पुरी, किंवा पराठा झटपट बनवण्यासाठी खूप कौशल्य आणि मेहनत घ्यावी लागते. नव्यानेच स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरी, चपाती आणि पराठा बनवणे हे फार अवघड आणि वेळ खाऊ काम आहे. अशा लोकांसाठी आज झटपट पुरी बनवण्याची सोपी ट्रिक सांगणार आहोत . ही ट्रिक तुमचा मौल्यवान वेळ वाचवलेच आणि तुम्हाला फारशी मेहनत नाही घ्यावी लागणार नाही. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जी लाटणे न वापरता पुऱ्या तयार केल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये क्लिपमध्ये एक महिला कणकेचे समान छोटे गोळे बनवत आहे. हे गोळे एका प्लास्टिकच्या कागदावर ठेवताना दिसते. ती कणकेचे गोळे एकमेकांपासून दूर ठेवते जेणेकरून ते चपटे झाल्यावर ते एकमेकांना चिकटू नयेत. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसे ती प्लास्टिकच्या शीटच्या अर्ध्या भागाने पीठाचे गोळे झाकते आणि पळपोळ त्यावर उलटा ठेवून जोरात दाबते. ही क्रिया ती प्रत्येका गोळ्यावर करते आणि त्याती पुरी तयार होते. तयार पुरी तेलात टाकून तळते. ज्यांना गोल चपाती पुरी लाटता येत नाही त्यांच्यासाठी हा जुगाड उपयोगी ठरू शकतो. रुची केवत (@itz_ruchi___123) या इंस्टाग्राम युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, “ लाटणं न वापराता बनवा पूरी.”

हेही वाचा – धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

हेही वाचा – हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला लागले महाराष्ट्राच्या मिसळ पावचं वेड! ED Sheeranने स्वत: बनवली झणझणीत मिसळ, Video एकदा बघाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडीओने नेटकऱ्यांची लक्ष वेधले आहे. व्हिडिओला ५ दशलक्षाहून अधिक लोकांना पाहिला आहे. अनेकांना व्हिडीओ आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत महिलेच्या देशी जुगाडचे कौतूक केले आहे. एकाने व्हिडीओ पाहून लिहिले की, “अप्रतिम कल्पना आहे मीसुद्धा करून पाहणार. दुसऱ्याने लिहिले, “ही एक उत्कृष्ट कल्पना आहे,” तिसरी व्यक्ती म्हणाला मलाही ही युक्ती वापरायची आहे. काही वापरकर्त्यांनी असेही सांगितले की, “जेव्हा बरेच पाहुणे घरी येतात तेव्हा ही युक्ती खूप उपयोगी पडेल.”