भारतीय लोकांचे जेवण हे पोळी किंवा फुलक्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येकाला फुललेली आणि गरम पोळी खायला आणि बनवायला आवडते. जेव्हा पोळी गोल येते आणि छान फुलते तेव्हा बनवणाऱ्याला आणि खाणाऱ्यालाही आनंद होतो. परंतु अनेक लोक पोळीसाठी पीठ मळताना अशी एक चूक करतात, ज्यामुळे आपली पोळी फुलत नाही आणि काही वेळात पापडासारखी कडक होते. आज आपण नरम आणि फुलणारी चपाती कशी बनवायची ते जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– पोळी, पुरी किंवा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पीठ मळणे सगळ्यात महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना हे काम कंटाळवाणे वाटते, परंतु स्वयंपाक घरातील हे सर्वात महत्वाचे काम आहे.

– पीठ मळायला जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु पटापट पीठ मळल्याने आपल्या पोळीची चव खराब होऊ शकते, म्हणून ५ ते १० मिनिटे पीठ मळा.

आणखी वाचा : तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

– जरी आपण अनेक गोष्टी मोजून मापून करतो, तरी पीठ मळताना आपण मोजून पाणी घेत नाही, तर अंदाजे घेतो. बऱ्याचवेळा असे केल्याने पीठ एकतर कडक होते किंवा खूप मऊ होते. त्यामुळे परफेक्ट पीठ मळण्यासाठी मोजून पाणी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, २ कप पीठासाठी २ कप पाणी घ्या.

– नरम पोळी करण्यासाठी कधीपण एकत्र पाणी टाकून पीठ मळू नका. नेहमी पीठात थोडं थोडं पाणी टाका.

आणखी वाचा : लिंबू फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे का? फायदे, तोटे आणि उपाय

– पीठ मळताना त्यात मीठ घालणार असाल तर, पाणी कमी प्रमाणात वापरा. कारण मीठ देखील पाणी सोडते. यामुळे पीठाला कणिक ओलं होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

– एकदा कणिक मळून झालं की कणिकाच्या गोळ्याला पसरवा आणि त्यावर थोड पाणी शिंपडून ५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर पुन्हा एकदा कणिकाला चांगले मळा.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

– त्यानंतर छोटा चमचा तेल किंवा तूप घ्या आणि पुन्हा एकदा पीठ मळा, या वेळी पीठ मऊ आणि गुळगुळीत होईल.

आणखी वाचा : झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

– त्यानंतर पोळी करा ही पोळी नक्कीच मऊ असेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make soft roti or chapati perfect dough making tricks dcp
First published on: 26-06-2021 at 17:58 IST