Multigrain Chapati Flour: भारतातील प्रत्येक घरात तांदळाप्रमाणेच गव्हाच्या पिठाची पोळी हादेखील दैनंदिन आहारातील मुख्य भाग आहे. परंतु, बहुतेक लोक गव्हाच्या पिठाची पोळी अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनविण्यासाठी त्यामध्ये काही पौष्टिक पिठांचा वापर करतात. ते पौष्टिक पीठ नक्की कोणते हे आपण जाणून घेऊ
गव्हाच्या पिठात मिक्स करा हे पीठ
जवस पावडर
तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये जवस पावडरदेखील मिळू शकता. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण खूप जास्त असते. जवस पावडर गव्हाच्या पिठात मिक्स केल्याने पोळीची चव वाढते.
ओट्स
ओट्समध्ये भरपूर पौष्टिक, फायर मँगनीज, मॅग्निशियम, फॉस्फरस आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही ओट्स गव्हाच्या पिठात मिसळू शकता. ते मिसण्यासाठी ओट्स बारीक करून, त्याची पावडर बनवा आणि ते पिठात मिसळा. वजन कमी करण्यासाठीही हे उपयुक्त आहे.
बेसन
तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये बेसनदेखील घालू शकता. बेसनमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
वाळलेली मेथी
वाळलेल्या मेथीमुळे पोळीचा सुगंध वाढतो. हे पचनासाठीदेखील चांगले आहे. त्यासाठी सुकलेल्या मेथीची पावडर पिठात मिसळा.
ओवा
ओव्यामध्ये अनेक खनिजे आणि फायबर असतात. ओवा पचनासाठीदेखील खूप फायदेशीर मानला जातो. गव्हाच्या पिठात ओवा घातल्याने पोट फुगत नाही आणि पोळीची चवदेखील छान लागते.