How To Reduce Plastic In Your Kitchen : अगदी भाजी आणण्यापासून ते जेवण बनवताना साठलेला कचरा टाकण्यापर्यंत आपण सगळेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतो. यामुळे अनेकदा कळत-नकळत अगदी स्वयंपाकघरातील भांड्यांवरही प्लास्टिकचे तुकडे चिटकलेले असतात. तर या छोट्या प्लास्टिकच्या तुकड्याने मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात. तर हे मायक्रोप्लास्टिक्स हळूहळू तुमच्या शरीरात सुद्धा जाऊ शकतात. मग आता यासाठी नक्की काय करावं असा प्रश्न तुमच्याही मनात आलाच असेल ना? तर तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिक काढून टाकण्यासाठी पुढील काही छोटे छोटे बदल तुमच्या कामी येऊ शकतात.

तर प्लास्टिकच्या भांड्यांऐवजी काचेची, स्टेनलेस स्टील किंवा लाकडी भांडी वापरण्याचा प्रयत्न करा. हे बदल सोपे, परवडणारे आणि तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी खूपच चांगले आहेत. पण, याची सुरुवात कशी, कुठून करायची माहिती नाही? मग पुढील टिप्स फॉलो करा.

मायक्रोप्लास्टिक्स हानिकारक का आहेत?

‘मायक्रोप्लास्टिक्स’ ही एक वाढती आरोग्य आणि पर्यावरणीय चिंता आहे. नॅशनल जिओग्राफिक मायक्रोप्लास्टिक्सची व्याख्या व्यावसायिक उत्पादन विकास आणि मोठ्या प्लास्टिकच्या विघटनामुळे उद्भवणारे लहान प्लास्टिक कण म्हणून करते. मायक्रोप्लास्टिक्स परिसंस्थांना आणि प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करतात. मायक्रोप्लास्टिक्स हानिकारक का आहेत.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अहवालात असे दिसून आले आहे की, प्राणी आणि पेशींच्या अभ्यासातून मायक्रोप्लास्टिक्सचा संबंध अनेक जैविक बदलांशी जोडला गेला आहे, ज्यात जळजळ, बिघडलेली रोगप्रतिकारक शक्ती, बिघडलेले ऊती, बदललेले चयापचय कार्य, असामान्य अवयव विकास, पेशींचे नुकसान ; यांचा समावेश आहे. या परिणामांवरून असे दिसून येते की, मायक्रोप्लास्टिक्स मानवांसाठी देखील हानिकारक असू शकतात, ज्यामुळे दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करणे महत्त्वाचे ठरते.

तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिक काढून टाकण्याच्या ६ सोप्या टिप्स (How Do I stop Using Plastic In My Kitchen)

१. प्लास्टिक कंटेनर वापरू नका

तुम्ही प्लास्टिकमध्ये मसाले आणि किराणा सामान ठेवत असाल तर आतापासून स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या कंटेनरचा किंवा बरण्यांचा वापर करा. स्टेनलेस स्टील किंवा काच टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहेत. शिवाय, तुमचे स्वयंपाकघर आणखीन आकर्षित करतात.

२. सिलिकॉन झाकण आणि पर्यावरणपूरक आवरणे वापरा

एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आवरणांऐवजी, मेणाची आवरणे किंवा सिलिकॉन स्ट्रेच झाकण वापरून पहा. ही झाकणे पुन्हा वापरता येण्याजोगे, पर्यावरणपूरक आणि बजेट फ्रेंडली आहेत.

३. स्वतःची किराणा सामानाची बॅग सोबत ठेवा

तुम्ही बाहेर खरेदी करत असताना प्लास्टिकच्या पिशव्या तुम्हाला सामान ठेवण्यासाठी दिल्या जातात आणि मग या असंख्य पिशव्या आपण घरात एका मोठ्या पिशवीत जमा करून ठेवतो. तर हे टाळण्यासाठी बाजारात स्वतःच्या कापडी पिशव्या घेऊन जा. ही एक साधी सवय तुम्हाला प्लास्टिक पूर्णपणे टाळण्यास मदत करते. यामुळे तुमचे स्वयंपाकघरही थोडे स्वच्छ राहते.

४. प्लास्टिक स्क्रब टाळा

प्लास्टिक डिश स्क्रबर्स मायक्रोप्लास्टिक बाहेर टाकतात. त्याऐवजी, कंपोस्टेबल स्पंज, बांबू स्क्रबर्स किंवा पुन्हा वापरता येणारे डिशक्लोथ निवडा. यामुळे सिंकमध्ये किंवा तुमच्या प्लेट्सवर प्लास्टिकचे डाग राहत नाहीत.

५. घरगुती एअर फ्रेशनर्स

​​घरी स्वतःचे एअर फ्रेशनर्स बनवता येत असेल तर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेले महागडे एअर फ्रेशनर्सवर पैसे का खर्च करायचे? स्प्रेच्या बाटलीमध्ये व्हिनेगर, पाणी आणि लिंबाच्या साली मिक्स करा. अतिरिक्त ताजेपणासाठी तुमच्या आवडत्या तेलाचे काही थेंब घाला. तुमचे घरगुती एअर फ्रेशनर्स तयार.

६. प्लास्टिक रॅपर टाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा वापरता येण्याजोग्या किंवा कंपोस्टेबल पाऊचमध्ये पॅक केलेले स्नॅक्स निवडा. त्याहूनही चांगले, तुमचे आवडते पदार्थ तुमच्या स्वतःच्या टिफिन बॉक्समध्ये घेऊन जा. हा सोपा उपाय प्लास्टिकच्या रॅपर्सवर घरातून कमी करते आणि तुमचे स्नॅक्स ताजे सुद्धा ठेवते.