How To Store Dal And Rice For Long Time : पावसाळा सुरू होताच आर्द्रता वाढू लागते. अशा परिस्थितीत घरी बनवलेले किंवा बाहेरून आणलेले पदार्थ लवकर खराब होऊ लागतात. या ऋतूत जर तुम्ही तांदूळ आणि डाळींसह काही वस्तू व्यवस्थित साठवल्या नाहीत तर त्यामध्ये किडे, कीटक होऊ शकतात; ज्यामुळे कधीकधी दुर्गंधी देखील येऊ लागते. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात पदार्थ योग्यरित्या साठवणे अत्यंत महत्वाचे आणि जबाबदारीचे ठरते.

पण, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत; ज्याचे पालन करून तुम्ही तांदूळ, डाळी आणि इतर अन्नपदार्थ दीर्घकाळ पावसाळ्यात साठवून ठेवू शकता.

हवाबंद कंटेनर वापरा – पावसाळ्यात तांदूळ, डाळ जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी हवाबंद डबे वापरा आणि थंड, कोरड्या जागी ठेवा. डब्यात कडुलिंबाची पाने किंवा वाळलेल्या लाल मिरच्या टाका आणि कीटक दूर ठेवा आणि सगळ्यात शेवटी म्हणजे झाकण व्यवस्थित लावायला विसरू नका.

उन्हात ठेवा – तांदूळ आणि डाळ साठवण्यापूर्वी उन्हात ठेवा. यामुळे त्यातील ओलावा सहज निघून जाईल आणि खराब होण्याची शक्यता कमी होईल. डाळ आणि तांदूळ दर १५ ते २० दिवसांनी १ ते २ तास उन्हात ठेवणे नेहमीच चांगले ठरू शकते.

लवंग आणि सुक्या लाल मिरच्या – तांदूळ आणि डाळ सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही डब्यात काही लवंगा किंवा सुक्या लाल मिरच्या देखील घालू शकता. त्यांचा तिखट वास कीटकांना दूर ठेवतो.

मीठ आणि हिंग वापरा – तांदूळ आणि डाळ यांना ओलाव्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही मीठ, हिंग देखील वापरू शकता. यासाठी, एक लहान कापडात बांधून मीठ डब्यात ठेवा. यामुळे धान्य कोरडे राहतील आणि हिंग टाकल्याने कीटकही येणार नाहीत.