दात आणि आरोग्य हे एकमेकांशी निगडित असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम होतो. हल्ली अनेकांना दाताच्या समस्या सतावत असतात. महागड्या टूथपेस्ट तसेच ब्रश वापरूनही लोकांच्या तक्रारी असतात. दातांच्या समस्यांकडे काहीजण गांभीर्याने लक्ष देत नाहीत. तसेच अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न राखणं किंवा स्मोकिंग या कारणांमुळे आपल्या हिरड्या खराब होतात. वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हिरड्यांचं दुखणं वाढतं आणि मग त्यावर सूजही येते. हिरड्या कमकुवत झाल्या तर दात सुद्धा कमकुवत होतात. या घरगुती उपायांनी तुम्ही दातांची योग्य निगा राखू शकतात, चला तर मग जाणून घेऊयात…

दातांवर होणारे गंभीर परिणाम

तणावपूर्ण जीवनशैलीमुळे बरेच लोक मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सुरुवात करतात, ज्याचा नंतर दातांवर गंभीर परिणाम होतो. प्रामुख्याने खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे दातांवर परिणाम होतात. त्यामुळे तरुण वयातच दातांचे आरोग्य बिघडत चालले आहे. जनजागृतीअभावी ग्रामीण भागात दातांची समस्या अधिक आहे. शहरांमध्ये जंक फूड आणि इतर काही वाईट जीवनशैलीच्या सवयींमुळे दातांच्या समस्या निर्माण होतात. अस्वास्थ्यकर आहार आणि अन्नात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने काही लोकं दातांच्या आजारालाही बळी पडत आहेत.

दातांच्या किरकोळ समस्येकडे दुर्लक्ष करू नये. तरुणांव्यतिरिक्त आता लहान मुलांमध्येही दातांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात. दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे आणि दातांमधील संवेदनशीलता याकडे दुर्लक्ष करू नये. शक्य तितक्या लवकर दंतचिकित्सकांना भेट देऊन योग्य उपचार घ्या.

दुधाच्या बाटलीमुळे बाळांच्या दातांचे नुकसान होऊ शकते

दुधाच्या बाटल्यांमुळे मुलांच्या दातांना इजा होऊ शकते. जे बाळ दुधाची बाटली वापरतात त्यांचे पुढचे दुधाचे दात अनेकदा गळतात. प्रत्येक आहारानंतर मातांनी बाळाच्या हिरड्या आणि दात स्वच्छ कपड्याने पुसले पाहिजेत. लक्ष न दिल्यास दातांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मातांनी बाळांना स्तनपान करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.

दातांची काळजी घेण्याचे ५ उपाय

दिवसातून दोनदा ब्रश करा.

जास्त साखर खाणे टाळा. पिष्टमय पदार्थामुळेही दात किडण्याची शक्यता असते.

तसेच जीभ नियमित स्वच्छ करा.

दातांच्या कोणत्याही असामान्य समस्येकडे दुर्लक्ष करू नका. जर हिरड्या सुजल्या असतील किंवा रक्तस्त्राव होत असेल तर दंतवैद्याचा सल्ला घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर ६ महिन्यांनी दंतचिकित्सकडे जाऊन दात तपासा. दात स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.